राज्यातील खाजगी शाळांतील आरटीई प्रवेशाच्या ३० हजार जागा रिक्त


वृत्तसंस्था

मुंबई – शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत राज्यातील खाजगी शाळांतील आरटीई प्रवेशाच्या यंदा ३० हजार ६०० जागा अद्याप रिक्त आहेत. त्यामुळे पुढील २५ दिवस प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. 30 thousand seats are vaccant in RTE

राज्यात ९ हजार ४३२ शाळांमध्ये उपलब्ध ९६ हजार ६९४ जागा उपलब्ध असून त्यांपैकी केवळ ६६ हजार ८४ जागावरच प्रवेश झाले आहेत. ‘आरटीई’च्या प्रवेशाच्या सोडतीत नाव आलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण होऊन प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेशही पूर्ण होत आले असल्याची माहिती शिक्षण संचालनालयाकडून देण्यात आली.



गेल्या वर्षी आरटीईच्या एक लाख १५ हजार जागा होत्या. त्यात यंदा घट होत केवळ ९६ हजार ६८४ जागा उपलब्ध आहेत. जागा उपलब्ध असताना आणि प्रतीक्षा यादीतील विद्यार्थी रांगेत असतानाही प्रवेश का होत नाहीत, असा प्रश्न पालक विचारत आहेत. दरम्यान, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घेता यावा, यासाठी आरटीई प्रवेशाची मुदत आणखी २५ दिवस वाढवण्यात आली आहे.

30 thousand seats are vaccant in RTE

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात