भूपेंद्र पटेलांनी बदलले अख्खे कॅबिनेट; पण यात कोणतेही “रॉकेट सायन्स” नाही, हे तर मोदींचे जुनेच धक्कातंत्र!!


विशेष प्रतिनिधी

गांधीनगर : गुजरातमध्ये नवे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी – गृहमंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली आपले अख्खे कॅबिनेट बदलून टाकले आहे. जुन्यापैकी कोणत्याही नेत्याला आपल्या मंत्रिमंडळात संधी दिलेली नाही.Bhupendra Patel changes entire cabinet; But there is no “rocket science” in this, this is Modi’s old shock system !!

वरिष्ठ नेते म्हणून विधानसभेचे मावळते अध्यक्ष राजेंद्र द्विवेदी यांची मंत्रिमंडळात वर्णी लावण्यात आली आहे. बाकीचे सर्व नवे चेहरे मंत्रिमंडळात घेण्यात आले आहेत. अर्थात, यात कोणतेही “रॉकेट सायन्स” नाही. कारण हे नरेंद्र मोदी यांचे जुने धक्कातंत्र आहे.



मोदींनी 2001 मध्ये केशुभाई पटेल यांच्यानंतर गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यावर सुरुवातीला जुन्या तंत्राने वागले. वर्षभरातच त्यांनी आपले स्वतःचे तंत्र विकसित करून गुजरात भाजपा मधल्या सर्व जुन्या नेत्यांना बाहेरचा रस्ता दाखवला होता.

या नंतरच्या प्रत्येक पाच वर्षांनी मोदींनी आपल्या कॅबिनेटमध्ये अमुलाग्र बदल केल्याचे आढळते. आनंदीबेन पटेल, विजय रूपाणी नितीन पटेल ही मोदींनी संधी प्राप्त करून दिलेल्या नेत्यांची उदाहरणे आहेत. जुन्या नेत्यांना बाजूला सारून वर उल्लेख केलेल्या नेत्यांना मोदींनी संधी दिली आहे.

मोदींच्या धक्का तंत्राचे आणखी उदाहरणच द्यायचे झाले तर 2007 मध्ये त्यांनी विद्यमान 62 आमदारांचे तिकीट कापले होते. त्यापैकी 42 जागा नव्या उमेदवारांमुळे भाजपच्या पदरात पुन्हा एकदा पडल्या होत्या. त्यामुळे आपोआपच मंत्रिमंडळात 70 टक्क्यांपेक्षा जास्त बदल झाला.

असाच प्रयोग त्यांनी 2012 मध्ये केला होता. पक्षसंघटनेत देखील त्यांनी याच प्रकारचे बदल घडवून आणले होते. त्यामुळे नवे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी स्वतःचे मंत्रिमंडळ जरी बनविले असले तरी त्यावर छाप अन्य कुणाची नसून ती फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

नितीन पटेल यांची नाराजी, अन्य वरिष्ठ मंत्री यांची नाराजी याच्या दोन दिवस बातम्या चालल्यानंतर मंत्रिमंडळाचा आज विस्तार करण्यात आला. त्यात मोदी यांनी आपले जुने धक्कातंत्र वापरत भूपेंद्र पटेल यांना संपूर्ण मंत्रिमंडळ बदलायला लावले आहे. आनंदीबेन पटेल, विजय रूपाणी, नितीन पटेल यापैकी एकाची ही नाराजी काम करू शकलेली दिसत नाही. मंत्रिमंडळाच्या शपथविधीला विजय रूपाणी उपस्थित होते.

  •  निमा आचार्य विधानसभेच्या नव्या अध्यक्ष अध्यक्ष असतील.
  • याखेरीज खालील मंत्र्यांनी आता शपथ घेतली आहे.
  • उदय सिंह चव्हाण, मोहनलाल देसाई, गणेश पटेल, हर्ष सांघवी, जगदीश ईश्वर, बृजेश मेरजा, जीतू चौधरी, मनीषा वकील.
  • कनुभाई देसाई, किरीट सिंह राणा, नरेश पटेल, प्रदीप सिंह परमार, अर्जुन सिंह चौहान राघवी जी पटेल, पूर्णेश मोदी, ऋषिकेश पटेल, जीतू वघानी, राजेंद्र त्रिवेदी.

यापैकी कोणीही आधीच्या मंत्रिमंडळात मंत्री नव्हते नऊ जणांना कॅबिनेट मंत्री पदाची आणि 15 जणांना राज्यमंत्री पदाची शपथ देण्यात आली आहे.

Bhupendra Patel changes entire cabinet; But there is no “rocket science” in this, this is Modi’s old shock system !!

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात