उध्दव ठाकरे आणि माफिया सेनेची गेली इज्जत, किरीट सोमय्या यांची टीका


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या माफिया सेनेची इज्जत गेली आहे. गोवा, उत्तर प्रदेशातील जनतेने त्यांना दाखवून दिलं आहे. संजय राऊत यांच्यामार्फत स्टंट करून काहीही साध्य होत नाही, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे.Uddhav Thackeray and Mafia Sena’s last respect, Kirit Somaiya’s criticism

किरीट सोमय्या म्हणाले, नील सोमय्यांच्या याचिकेवर सुनावणी करताना राज्य सरकारने त्यांची कुठलीही चौकशी करत नसल्याचं सांगितले. उच्च न्यायालयात ठाकरे सरकारनं स्वत:ची इज्जत घालवून घेतली. संजय राऊत यांनी नील सोमय्यांविरोधात दिलेल्या कागदपत्रांचे पुढे काय झाले? न्यायालयात ठाकरे सरकारला लोटांगण घालावे लागले.नीलवर तुम्ही जो अत्याचार केला त्याचा हिशोब सोमय्या नक्की घेणार. राऊत तुमच्या माफिया सेनेत दम असेल तर मला हात लावून दाखवा. पुण्यात शिवसेनेनं ७७ गुंड मला मारण्यासाठी पाठवले त्यातील ३० मुंबईतले होते.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी नील सोमय्या यांच्यावर घोटाळ्याचे आरोप केले होते. त्या आरोपांची चौकशी मुंबई पोलीस करणार असल्याचं ते म्हणाले. इतकेच नाही तर बाप-बेटा जेलमध्ये जाणार असल्याचंही राऊतांनी दावा केला होता. या आरोपानंतर नील सोमय्यांनी अटकपूर्व जामीनासाठी हायकोर्टात अर्ज सादर केला होता.

Uddhav Thackeray and Mafia Sena’s last respect, Kirit Somaiya’s criticism

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था