कम्युनिस्टांचे केरळ अजूनही कोरोनाबाधितांच्या संख्येत देशात टॉप


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : गेल्या चोवीस तासात देशात 24 हजार 354 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. याच कालावधीत 234 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. यात सर्वाधिक संख्या केरळ राज्यातील 13 हजार 834 कोरोना बाधितांची आहे. देशात सध्या 2 लाख 73 हजार 889 सक्रीय कोरोना रुग्ण असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीवरुन स्पष्ट झाले आहे.The most educated state Kerala led by Communists remains top contributor in Covid-19 cases and deaths.

देशातील एकूण 234 कोरोनाबळींपैकी 95 बळी केरळ राज्यातले आहेत. कोरोना महामारी देशात आल्यापासून गेल्या दीड वर्षाच्या काळातील एकूण कोरोना बळींची संख्या आता 4.48 लाखांवर गेली आहे.



कोरोना महामारीच्या तिसऱ्या संभाव्य लाटेचा धोका आता दूर झाल्याचे चित्र देशात आहे. मात्र त्याचवेळी डोंगरदऱ्यात वसलेले मिझोरामसारखे ईशान्येकडच्या राज्यात अजूनही कोरोनाचा संसर्ग खूप आहे. विशेषतः मुलांमध्ये कोरोनाची लागण इतर राज्यांच्या तुलनेत जास्त असल्याचे येथे दिसून आले आहे.

ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीतले 16 टक्के कोरोनाबाधित दहा वर्षांच्या आतील वयोगटातले आहेत. हे प्रमाण राष्ट्रीय सरासरीच्या दुप्पट आहे. सुदैवाने यातील कोणीही गंभीर नाही. निवासी शाळा आणि अनाथालयांमध्ये कोरोना संसर्ग पसरल्याचे प्रामुख्याने आढळले आहे.

मिझोराममधील कोरोना महामारीच्या नोंदी अद्ययावत ठेवल्या जात असल्याने मिझोराममधील कोरोनाबाधितांची संख्या तुलनेने जास्त दिसते, असा दावा स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांनी केला आहे. कॉन्टँक्ट ट्रेसिंग आणि टेस्टिंगचे प्रमाण मिझोराममध्ये चांगले आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.

कोविड रुग्णांना आर्थिक मदत देण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयाने केली. यानंतर केंद्र सरकारने राज्य आपत्कालीन प्रतिसाद निधीतून कोरोनाबळींच्या निकटच्या नातेवाईकांना प्रत्येकी पन्नास हजार रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाने यासाठी 7 हजार 400 कोटी रुपये यापूर्वीच मंजूर केले असल्याचे गृह खात्याने नुकतेच सांगितले. तेवीस राज्यांना हे पैसे दिले जाणार आहेत.

The most educated state Kerala led by Communists remains top contributor in Covid-19 cases and deaths.

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात