विशेष प्रतिनिधी
मुंबई : राहुल गांधींना राष्ट्रीय नेता बोलल्याचे बैलांनाही आवडले नाही. त्यामुळेच बैलगाडी तुटली असा हल्लाबोल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसने मुंबईत आंदोलन केले. Rahul Gandhi as a national leader. Opposition leader Devendra Fadnavis has attacked the bullock cart for breaking it.
या आंदोलनादरम्यान गाडी तुटल्याने मोर्चात एकच गोंधळ उडाला. यावर फडणवीस म्हणाले, राहुल गांधींना राष्ट्रीय नेता बोलल्याचं बैलांना देखील आवडलेले दिसत नाही. त्यामुळे ती बैलगाडी तुटली.मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्या अध्यक्षतेखाली पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात आंदोलन करण्यात आलं.
इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी भाई जगताप आणि काँग्रेसचे इतर नेते बैलगाडीतून आंदोलनात सहभागी झाले. मात्र, बैलगाडीची क्षमता लक्षात न घेता नेते, कार्यकर्ते बैलगाडीत चढले. भार जास्त झाल्याने बैलगाडी मोडली आणि भाई जगताप यांच्यासह गाडीत असलेले सर्वच नेते व कार्यकर्ते कोसळले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
यावर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर म्हणाले, इंधन दरवाढी विरोधातील आंदोलनात बैलगाडीवरून भाई जगताप व अन्य काँग्रेस नेते खाली पडल्यामुळे झालेले काँग्रेचे हसू संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले. राहुल गांधी जिंदाबाद अशा घोषणा देत असताना माणसाचे तर दुरंच राहिले, पण बैलालाही ते सहन झाले नसावे.
कार्यकर्त्यांनी बैलगाडीवर चढतांना तेथील महिलांचाही विचार केला नाही. त्यामुळे हे आंदोलन विस्कळीत आणि अनियोजनबद्ध पद्धतीने पार पडले. एका बाजूला राज्य सरकार करोना वाढल्याचे ओरडून ओरडून सांगत असताना, दुसरीकडे सत्ताधारी पक्षातील नेते व कार्यकत्यांनी आंदोलनाच्या नावाखाली सोशल डिस्टंसिंग फज्जा उडविला व करोनाचे नियमही धाब्यावर बसवल्याचा असा आरोप दरेकर यांनी केला.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App