लष्करातील महिलाशक्ती काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात लढणार, आसाम रायफल्सच्या महिला सैनिकांवर जबाबदारी


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : लष्करातील महिलाशक्ती काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात लढणार आहे. भारतीय लष्कराने आसाम रायफल्सच्या महिला सैनिकांवर मोठी जबाबदारी सोपवली आहे. या महिला सैनिकांना काश्मीरमधील गांदरबल जिल्ह्यात तैनात करण्यात आले आहे. ज्यामध्ये या महिला सैनिक पुरुष सैनिकांना या खोºयातील दहशतवादी कारवाई रोखण्यासाठी मदत करणार आहे.Army women to fight terrorists in Kashmir Valley, Assam Rifles women soldiers

महिला व मुलांची तपासणी करण्यासाठी या महिला सैनिकांना मोटार वाहन चौक्यांवर तैनात करण्यात आले आहे. त्यासोबतच कॉर्डन अँड सर्च ऑपरेशन दरम्यान घरांची तपासणी करण्यासाठी या महिला सैनिकांची मदत घेतली जाणार आहे.



या महिला सैनिकांना काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात तैनात करण्यात आले असून यांना या भागातील मादक पदार्थांची तस्करी थांबवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. यापूर्वी पुरुष सैनिकांना संशयित महिलांची तपासणी करण्यास अडचण येत होती. त्यामुळे भागातील तस्करी मोठ्या प्रमाणात कमी होतील.

काश्मीरमधील मुलींमध्येही पोलिसांत रुजू होण्याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. नुकत्याच झालेल्या पोलिस भरतीत काश्मीरमधील 2 हजार मुलींनी सहभाग घेतला होता. ही भरती 650 पदासाठी करण्यात आली होती. येथे दोन महिला बटालियन तयार करण्यात येणार असून यासाठी 650-650 महिलांची भरती घेण्यात येत आहे.

भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात मुलींनी सहभाग घेतला असून देशसेवेसाठी अनेक मुली उत्साही होत्या. 26 वर्षीय सना जान ही उत्तर काश्मीरची रहिवासी म्हणते की, पोलिसांत रुजू होणे माझी आवड आहे. यामुळे मला देशसेवा करायची असून माझ्या समाजावरील गुन्हेगारीचे डाग मिटवायचे असल्याचे सना यांनी सांगितले.

Army women to fight terrorists in Kashmir Valley, Assam Rifles women soldiers

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात