राहुलजींच्या चोर की दाढी… ट्विटला भाजपचे आक्रमक आव्हान; २०२४ ची लोकसभा निवडणूक पण राफेल मुद्द्यावर लढून दाखवा…!!


प्रतिनिधी

नवी दिल्ली – भारताशी झालेल्या राफेल फायटर जेटच्या निर्यात व्यवहाराची फ्रान्समध्ये न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. त्यावर काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी फक्त ३ शब्दांचे ट्विट केले आहे… चोर की दाढी… मात्र, या ट्विटला भाजपने आक्रमक प्रत्युत्तर दिले असून त्यांनी २०२४ ची लोकसभा निवडणूक राफेलच्या मुद्द्यावर लढून दाखवावी, असे आव्हान दिले आहे. Rahul Gandhi, after having heaped choicest abuses in the run up to 2019, has now stooped down to this level.

३६ राफेल फायटर जेटच्या झालेल्या व्यवहाराची आता फ्रान्समध्ये न्यायालयीन चौकशी होणार आहे. या पार्श्वभूमीवर खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर आणि विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. चोर की दाढी… हे तीनच शब्द जरी त्यांनी ट्विट केले असले, तरी त्या हिंदी मुहावऱ्याचा अर्थ चोर की दाढी में तिनका म्हणजे चोरीचा काही पुरावा आहे, असा आहे. या ट्विटमध्ये मुद्दाम राहुल गांधींनी #RafaleScam असा हॅशटॅग देखील वापरला आहे.



यातला आशय लक्षात घेऊन भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालविय यांनी राहुल गांधींना आव्हान दिले आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत राहुलजींच्या राफेलच्या मुद्द्यावरून भरपूर शिव्या देऊन झाल्या आहेत. आता ते आणखी खालच्या पातळीवर उतरले आहेत. हरकत नाही. त्यांनी २०२४ ची लोकसभा निवडणूक पण राफेलच्याच मुद्द्यावर लढवून दाखवावी, असे आव्हान देणारे ट्विट अमित मालविय यांनी केले आहे. सोशल मीडियावर या ट्विटर युध्दाची जोरदार चर्चा सुरू आहे.

Rahul Gandhi, after having heaped choicest abuses in the run up to 2019, has now stooped down to this level.

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात