शिवसेना नेते खा. संजय राऊत यांची भाजप आ. आशिष शेलार यांच्याशी झालेल्या गुप्त भेटीची चर्चा राज्यात सुरू आहे. सोमवारपासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आणि सेना-भाजप राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर या भेटीवरून विविध चर्चांना उधाण आले आहे. सेना- भाजप पुन्हा एकत्र येणार का? असाही सवाल विचारला जात आहे. या भेटीवरून माजी अर्थमंत्री आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मत व्यक्त केलं आहे. “भाजप शिवसेनेसोबत जाण्यासाठी प्रयत्न करणार नाही. राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जाऊन चूक झाली असे शिवसेनेला वाटले तर ते येतील. तेव्हा भाजप विचार करेल,” अशी प्रतिक्रिया मुनगंटीवारांनी दिली आहे. BJP Leader Sudhir Mungantiwar Comment on Sanjay Raut Ashish shelar Meeting In Mumbai
विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिवसेना नेते खा. संजय राऊत यांची भाजप आ. आशिष शेलार यांच्याशी झालेल्या गुप्त भेटीची चर्चा राज्यात सुरू आहे. सोमवारपासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आणि सेना-भाजप राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर या भेटीवरून विविध चर्चांना उधाण आले आहे. सेना- भाजप पुन्हा एकत्र येणार का? असाही सवाल विचारला जात आहे. या भेटीवरून माजी अर्थमंत्री आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मत व्यक्त केलं आहे. “भाजप शिवसेनेसोबत जाण्यासाठी प्रयत्न करणार नाही. राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जाऊन चूक झाली असे शिवसेनेला वाटले तर ते येतील. तेव्हा भाजप विचार करेल,” अशी प्रतिक्रिया मुनगंटीवारांनी दिली आहे.
नागपूरमध्ये टीव्ही9 मराठी वृ्त्तवाहिनीशी बोलताना मुनगंटीवार यांनी संजय राऊत आणि आशिष शेलार यांच्या भेटीसंदर्भात भाष्य केले आहे. ते म्हणाले की, “भाजप आणि शिवसेना नेत्यांच्या भेटी होत असतात. ही परंपरा आहे. पण भाजप सत्तेसाठी आता शिवसेनेसोबत जाण्यासाठी प्रयत्न करणार नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाऊन चूक झाली असं शिवसेनेला वाटलं तर ते येतील. तेव्हा भाजप विचार करेल,” असे ते म्हणाले.
दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत आणि भाजप आ. आशिष शेलार यांची मुंबईतील नरिमन पॉइंट परिसरात अर्धा तास मीटिंग झाली. ही मीटिंग नेमकी कशामुळे झाली? काय विषय होता? या सर्व बाबी गुलदस्त्यात आहेत. पण या भेटीनंतर राजकीय वर्तुळात नव्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
BJP Leader Sudhir Mungantiwar Comment on Sanjay Raut Ashish shelar Meeting In Mumbai
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App