Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी नरेंद्र पाटलांच्या नेतृत्वात सोलापुरात आज आक्रोश मोर्चा; जिल्हाभरात संचारबंदी

Narendra Patil Maratha Akrosh Morcha in Solapur For Maratha Reservation Today

Maratha Reservation : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी आज सोलापुरात आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वात या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सोलापुरातील छत्रपती संभाजी महाराज चौकातून सकाळी 11 वाजता या मोर्चाला सुरुवात होणार असून जिल्हाधिकारी कार्यालयपर्यंत हा मोर्चा जाणार आहे. दुसरीकडे, पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारलेली असून आंदोलक मात्र मोर्चा काढण्यावर ठाम आहेत. Narendra Patil Maratha Akrosh Morcha in Solapur For Maratha Reservation Today


विशेष प्रतिनिधी

सोलापूर : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी आज सोलापुरात आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वात या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सोलापुरातील छत्रपती संभाजी महाराज चौकातून सकाळी 11 वाजता या मोर्चाला सुरुवात होणार असून जिल्हाधिकारी कार्यालयपर्यंत हा मोर्चा जाणार आहे. दुसरीकडे, पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारलेली असून आंदोलक मात्र मोर्चा काढण्यावर ठाम आहेत.

या आक्रोश मोर्चासाठी खासदार छत्रपती उदयनराजे, छत्रपती संभाजीराजे, नारायण राणे, रामदास आठवले यांना निमंत्रण देण्यात आलं होतं. परंतु यापैकी कुणीही मोर्चाला उपस्थित राहणार नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात येत आहे.

मराठा आक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांचा फौजफाटा सज्ज झाला आहे. शहरात येणाऱ्या सर्व मार्गांवर नाकेबंदी करण्यात आली आहे. हा मोर्चा छत्रपती संभाजी महाराज चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयपर्यंत जाणार आहे. मात्र, पोलीस चार पुतळा चौकात मोर्चा थांबवतील, अशीही माहिती माध्यमांनी दिली आहे. या मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. बंदोबस्तासाठी सोलापूर शहर आणि ग्रामीण पोलीस, एसआरपीएफच्या तुकड्या, होमगार्ड यांच्यासह सातारा, सांगली, उस्मानाबाद इत्यादी ठिकाणाहून अतिरिक्त पोलिसांची कुमक मागवण्यात आली आहे.

तथापि, सोलापूर शहर व जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदीचे आदेश दिले आहेत. याशिवाय खबरदारी म्हणून एसटी बससह इतर वाहनांचे वाहतुकीचे मार्ग बदलण्यात आले आहेत. दरम्यान, आम्ही शांततेत मोर्चा काढणार असून पोलिसांनी सहकार्य करावे, असे आवाहन लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी केले आहे. परंतु मराठा तरुणांची अडवणूक किंवा दडपशाही केल्यास त्यामुळे होणाऱ्या उद्रेकाला सर्वस्वी राज्य सरकार आणि पोलीस प्रशासन जबाबदार असण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

Narendra Patil Maratha Akrosh Morcha in Solapur For Maratha Reservation Today

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय