पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तामिळनाडूतल्या ४ आमदारांना चर्चेला वेळ दिला यातला राजकीय संदेश काय…??


सामान्य कार्यकर्त्याचे ऐकून घेणे आणि त्याच्याकडून विशिष्ट पध्दतीत फीडबॅक घेणे हा मोदींच्या राजकीय संस्कृतीचा सहज सर्वमान्य असा भाग आहे. याला संघ परिवारात प्रचारक, पूर्णवेळ, विस्तारक या संज्ञा आहेत. मोदींची कार्यशैली या तीनही संज्ञांशी मिळतीजुळती आहे. कारण ते स्वतः वर्षानुवर्षे प्रचारकाच्याच भूमिकेत राहिले आहेत. लक्ष्मणराव इनामदारांकडून आत्मसात केलेली ही भूमिका त्यांनी फारशी बदलेली नाही. या दृष्टिकोनातून मोदींनी तामिळनाडूतल्या ४ आमदारांना चर्चेला वेळ दिला, याकडे पाहिले म्हणजे त्याचे राजकीय मर्म समजू शकेल. the political message that Prime Minister Narendra Modi gave time to 4 MLAs from Tamil Nadu for discussion

 

भाजपचे तामिळनाडू प्रदेशाध्यक्ष डॉ. एल. मुरूगन यांच्यासमवेत तामिळनाडू विधानसभेतील भाजपचे ४ आमदार नयनार नागेंद्रन, वनाथी श्रीनिवासन, एम. आर. गांधी, सी. के. सरस्वती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीतील निवाससस्थान ७ लोककल्याण मार्ग येथे जाऊन भेट घेतली. या सर्व लोकप्रतिनिधींनी तामिळनाडूच्या विकास योजनांसंबंधी आपले विचार शेअर केले. त्यांच्या भविष्यकालीन योजनांना माझ्या शुभेच्छा असे ट्विट पंतप्रधान मोदींनी या भेटीनंतर केले आहे.

या भेटीचा नेमका राजकीय अर्थ काय आहे…?? हे समजून घेण्याची गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे सतत कार्यमग्न असणारे नेते एका राज्यातल्या ४ आमदारांना भेटीसाठी वेळ देतात आणि राज्यातल्या विकास योजनांबाबत चर्चा करतात याला नक्कीच राजकीय महत्त्व आहे. ते भाजपच्या दृष्टीने आहे.



दक्षिणेत पक्षाच्या विस्ताराच्या दृष्टीने आहे. पंतप्रधान मोदी स्वतः या विषयात लक्ष घालत आहेत, हा यातला राजकीय संदेश आहे, यामध्ये कोणतीही शंका नाही. उगीच “ताकाला जाऊन भांडे लपविण्याचा” प्रकार करण्यात मतलब नाही. तसा त्यांनी केलाही नाही. उलट तामिळनाडूतले भाजपचे ४ आमदार येऊन भेटल्याचे ट्विट पंतप्रधानांनी स्वतः केले आहे. यातूनच ते या भेटीला महत्त्व देतात हे अधोरेखित होते आहे.

पण पंतप्रधान मोदी ४ आमदारांना भेटतात, मग भले ते त्यांच्या स्वतःच्या पक्षाचे का असेनात यातला राजकीय संदेश भाजप पेक्षा इतर पक्षांच्या नेत्यांसाठी जास्त टोचणारा आहे… किंबहुना शिकण्यासारखाही आहे…!!

आपल्याच पक्षाच्या आमदारांना, उपनेत्यांना, नेत्यांना मुख्यमंत्री भेटत नाहीत ही तक्रार महाराष्ट्रातले शिवसेनेचे आमदार उघडपणे करतात. तशी पत्रे लिहितात. या पार्श्वभूमीवर तर पंतप्रधान ४ आमदारांना भेटतात यातला राजकीय संदेश फार महत्त्वाचा आहे. बरं मुख्यमंत्री हे आमदारांना भेटत नाहीत, ही तक्रार फक्त महाराष्ट्रातच आहे, असे नाही. जिथे जिथे राजकीय घराण्यांचे वारस मुख्यमंत्रीपदावर आहेत, तिथे तिथे ही तक्रार कमी अधिक प्रमाणात आहे.

एवढेच काय पण या देशात असेही नेते आहेत, की जे मुख्यमंत्री दर्जाच्या नेत्याला भेटतात. पण त्या भेटीच्या वेळी त्या नेत्याचे म्हणणे ऐकून घेण्यापेक्षा आपल्या लाडक्या कुत्र्याला बिस्किटे खायला घालणे पसंत करतात…!! असो… हा ज्या त्या नेत्याचा आणि त्याच्या राजकीय पक्षाच्या संस्कृतीचा विषय आहे. ज्या पक्षांचे तंबू फक्त आणि फक्त घराणेशाहीवरच उभे आहेत, त्या पक्षाच्या अन्य नेत्यांना आणि सामान्य कार्यकर्त्यांना असे अनुभव येणे आता नित्याच्या सवयीचेही झाले आहे.

प्रश्न आहे, पंतप्रधान मोदी ज्या पक्षाचे आणि राजकीय संस्कृतीचे प्रतिनिधित्व करतात, त्या पक्षात आणि राजकीय संस्कृतीत वर उल्लेख केलेल्या गोष्टी बसतच नाहीत. कारण मोदींचा पक्ष हा राजकीय घराणेशाहीचा तंबू नाही. इथे नेते येतात. काळ – कर्तृत्व गाजवतात आणि जातात. पक्षाचा आणि संघटनेचा प्रवाह चालत राहतो. मोदींवर भले विरोधक कितीही एककल्ली कारभाराचे आरोप करोत आणि त्यातल्या काही आरोपांमध्ये तथ्यही असो, तरी मोदींवर घराणेशाहीच्या राजकीय संस्कृतीचा आरोप कोणी करू शकणार नाही आणि केला तरी तो त्यांना चिकटणार नाही.

सामान्य कार्यकर्त्याचे ऐकून घेणे आणि त्याच्याकडून विशिष्ट पध्दतीत फीडबॅक घेणे हा मोदींच्या राजकीय संस्कृतीचा सहज सर्वमान्य असा भाग आहे. याला संघ परिवारात प्रचारक, पूर्णवेळ, विस्तारक या संज्ञा आहेत. मोदींची कार्यशैली या तीनही संज्ञांशी मिळतीजुळती आहे. कारण ते स्वतः वर्षानुवर्षे प्रचारकाच्याच भूमिकेत राहिले आहेत. अजूनही त्यांची ही भूमिका फारशी बदलेली नाही.

देशातल्या सर्व प्रकारच्या राजकीय रिपोर्टिंगच्या जगतात प्रचारक, पूर्णवेळ, विस्तारक या संज्ञांचा फारसा परिचय नाही. परिचय असलाच तर तो तोकडा आहे आणि त्याला रिपोर्टर्स आपापल्या फूटपट्ट्या लावून त्याच्याकडे पाहतात. देशातले राजकीय रिपोर्टर्स काँग्रेसी संस्कृतीच्या छाया – प्रकाशातच मोदींच्या कार्यशैलीकडे पाहतात आणि म्हणून कायम फसत असतात. मोदींचे राजकीय निर्णय त्यांना political surprise वगैरे वाटतात. पण प्रत्यक्षात तसे नसते.

हा विषय थोडा विस्ताराने लिहिण्याचे कारण असे, की मोदींनी तामिळनाडूतल्या ४ आमदारांना वेळ दिला त्यांच्याशी चर्चा केली यातल्या राजकीय संदेशाचा नेमका गाभा ठोबळ मानाने लक्षात यावा. मोदींच्या कार्यशैलीविषयी टीका टिपण्णी करताना नेमके मुद्दे मिळावेत. केवळ काँग्रेसी कार्यशैली – संस्कृतीच्या छाया – प्रकाशात पाहूनच मोदींच्या कार्यशैलीवर टीका – टिपण्णी होऊ नये आणि झाली तर ती फसवी ठरेल. हे लक्षात आणून देण्यासाठीच थोड्या विस्ताराने हा विषय लिहावासा वाटला.

याचा अर्थ असा अजिबात नाही की मोदी ज्या पक्षाचे आणि ज्या राजकीय कार्यशैली – संस्कृतीचे प्रतिनिधित्व करतात, त्यामध्ये अजिबात दोष नाहीत किंवा त्यांची कार्यशैली अगदी निर्दोष आहे, असाही माझा दावा नाही. किंबहुना त्यात एककल्लीपणाचे अनेक दोष आहेत. अनेकदा Holistic approach नसल्याचे दोष निर्माण झालेले आहेत. विचार आणि कृतीमध्ये विरोधाभास झाले आहेत. त्याचे राजकीय – सामाजिक फटकेही त्यांना बसले आहेत. पण हा विषय पूर्णपणे वेगळा आहे… त्याची चर्चा या ठिकाणी अप्रस्तूत ठरेल. त्या विषयावर नंतर कधीतरी चर्चा करू या…!!

 the political message that Prime Minister Narendra Modi gave time to 4 MLAs from Tamil Nadu for discussion

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात