विशेष प्रतिनिधी
बीड : संभाजीराजे बीड जिल्हा दौऱ्यावर आले असता, त्यांनी मुख्यमंत्रीपदासाठी आपली इच्छा बोलून दाखवली होती. आता यावरच सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली असून, सत्ता दिली म्हणजे प्रश्न सुटत नाही. चळवळ केली तर चळवळीतील प्रश्नांना यश मिळतं त्यासाठी मनात प्रामाणिकपणा असावा, पदासाठी चळवळ करणं कोणाच्या मनात येऊ नये, असे देखील धनंजय मुंडे बोलले आहेत. No one should think of running for office; Dhananjay Munde’s reaction to Sambhaji Raje’s statement
परळीमध्ये धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये बाह्यवळण रस्त्याचा शुभारंभ झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यादरम्यान त्यांनी ओबीसीच्या राजकीय आरक्षण आणि मराठा समाजाच्या आरक्षणावर महाविकास आघाडी सरकार सक्षमपणे लढणार असल्याचं देखील सांगितले. तर विधानसभेचे अध्यक्ष पद काँग्रेसकडेच राहणार आहे. त्यामुळे वायफळ चर्चेला अर्थ नसल्याचे धनंजय मुंडे यावेळी म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App