NCP – AIMIM Alliance : एमआयएमशी आघाडीचा निर्णय महाराष्ट्र पातळीवर होऊ शकत नाही – शरद पवार


प्रतिनिधी

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात एमआयएम पक्षाने मोठी खळबळ उडवून दिली आहे. पक्षाचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी करण्याचा प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावावर आज शरद पवार यांनी अशा पद्धतीचा निर्णय राज्याच्या पातळीवर होऊ शकत नाही, असे स्पष्ट करून सध्या तरी एमआयएम पक्षाशी आघाडी महाराष्ट्र पातळीवर फेटाळून लावली आहे. NCP – AIMIM Alliance maharashtra sharad pawar

– उद्धव ठाकरेंचे टीकास्त्र

राष्ट्रवादी काँग्रेस आणि एमआयएम पक्षाच्या आघाडीच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात शिवसेनेने संपूर्ण विरोधी भूमिका घेतली आहे. एमआयएम पक्षाशी आघाडी करण्याचा प्रस्ताव येणे हा भाजपचा डाव असल्याचे टीकास्त्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.

– ओवैसींशी पवारांची चर्चा नाही

या पार्श्वभूमीवर शरद पवार यांना प्रश्न विचारला असता त्यांनी आपली खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या बरोबर कोणतीही चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच कोणत्याही पक्षाशी आघाडी करायची अथवा नाही हा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये केंद्रीय पातळीवर होतो. महाराष्ट्र पातळीवर होत नाही, असा खुलासा शरद पवार यांनी केला आहे. आघाडी ज्या पक्षाशी करायची त्या पक्षाची मान्यता घ्यावी लागते आणि त्या पक्षाची केंद्रीय समितीची मान्यता देऊ शकते, याकडे शरद पवार यांनी लक्ष घातले आहे.

– याचा अर्थ नेमका काय?

शरद पवार यांनी महाराष्ट्र पातळीवर एमआयएम पक्षाशी आघाडी होऊ शकत नाही, असे नमूद केले आहे. याचा अर्थ शरद पवार यांना राष्ट्रीय पातळीवर त्या पक्षाशी आघाडी करायची आहे का…?? कारण राष्ट्रवादी काँग्रेसने उत्तर प्रदेश, गोवा तसेच मणिपुरी या तीन राज्यांमध्ये उमेदवार उभे केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचा दारुण पराभव झाला असला तरी वेगवेगळ्या राज्यांमध्ये उमेदवार उभे करून छोट्या स्वरूपामध्ये विविध पक्षांशी राष्ट्रवादी आघाड्या करत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पातळीवर एमआयएम पक्षाशी आघाडी होऊ शकत नाही, असे वक्तव्य शरद पवार यांनी केल्यामुळे त्यांना एमआयएम पक्षाशी राष्ट्रीय पातळीवर आघाडी करायची आहे का…??, असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतो आहे.

NCP – AIMIM Alliance maharashtra sharad pawar

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात