प्रतिनिधी
नवी दिल्ली : संपूर्ण देशात “द काश्मीर फाईल्स” या सिनेमा वरून राजकीय गदारोळ उठला असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अध्यक्ष अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी याविषयी आपले वेगळे मत व्यक्त केले आहे. “द काश्मीर फाईल्स” सिनेमा वरून देशातले वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. अशा पद्धतीचे सिनेमे काढून वातावरण बिघडणे योग्य नाही, अशा शब्दांमध्ये त्यांनी सिनेमावर टीकास्त्र सोडले. The Kashmir Files sharad pawar to faruk abdullah
शरद पवार म्हणाले, की ज्या घटनांवर आधारित “द काश्मीर फाईल्स” सिनेमा आहे त्यावेळी केंद्रात भाजपच्या पाठिंब्यावर विश्वनाथ प्रताप सिंह यांचे सरकार होते. जम्मू-काश्मीर मधून डॉ. फारूक अब्दुल्ला हे मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाले होते. राज्यात त्यावेळी राष्ट्रपती राजवट लागू झाली होती. विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या सरकारमध्ये गृहमंत्री देखील भाजपच्या पाठिंब्यावर होते, याकडे शरद पवार यांनी कटाक्ष केला. देश सध्या एका दिशेने चालला आहे. जुन्या कुठल्याही गोष्टी काढून सध्या समाजात वातावरण बिघडविण्याचा हा प्रयत्न आहे. तो कोणी करू नये, असे ते म्हणाले.
– पवार – अब्दुल्ला मैत्री जुनी
“द काश्मीर फाईल्स” या सिनेमावरून देशभरात राजकीय गदारोळ उठला असताना शरद पवार हे डॉ. फारुख अब्दुल्ला यांची पाठराखण करून आपल्या जुन्या मैत्रीला जागले आहेत. शरद पवार यांनी ज्याप्रमाणे आज या सिनेमावर मत व्यक्त केले आहे, तसेच मत डॉ. फारुख अब्दुल्ला आणि त्यांचे पुत्र ओमर अब्दुल्ला यांनी व्यक्त केले होते. या सिनेमात अर्धसत्य दाखवण्यात आले असल्याचा दावा या दोघांनी केला होता. आज शरद पवार यांनी अब्दुल्ला पिता-पुत्रांच्या भूमिकेवर आपल्या भूमिकेचे शिक्कामोर्तब केल्याचे दिसून येत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App