“द काश्मीर फाईल्स”पाहून येणाऱ्या भाजप खासदार जगन्नाथ सरकारांवर बंगालमध्ये बॉम्ब हल्ला!!


वृत्तसंस्था

कोलकाता : सध्या देशात “द काश्मीर फाईल्स” या या चित्रपटावरून आरोप-प्रत्यारोपांचा गदारोळ सुरू असताना पश्चिम बंगालमधील नदिया येथून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. BJP MP Jagannath Sarkar, who came to see “The Kashmir Files”, was bombed in Bengal

राणाघाटमधील भाजप खासदार जगन्नाथ सरकार यांच्यावर बॉम्ब हल्ला करण्यात आल्याचे समोर आले आहे. आपण “द काश्मीर फाईल्स” हा चित्रपट पाहून परतत होतो, त्यावेळी आपल्यावर बॉम्ब हल्ला करण्यात आल्याचे खासदार जगन्नाथ सरकार यांनी सांगितले.



– असा घडला प्रकार

पश्चिम बंगालच्या राणाघाट येथून भाजप खासदार जगन्नाथ सरकार यांच्या गाडीवर बॉम्ब हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात त्यांची कार जळाली असून ते सुदैवाने बचावले. शनिवारी संध्याकाळी ही घटना घडली. नदिया जिल्ह्यात द काश्मीर फाईल्स हा चित्रपट पाहण्यासाठी खासदार जगन्नाथ गेले होते. हा चित्रपट पाहून परत येत असताना त्यांच्या कारवर हा बॉम्ब हल्ला करण्यात आला. गाडीचा वेग असल्यामुळे गाडीच्यामागे हा बॉम्ब पडला. म्हणून, ते सुदैवाने बचावले, असे त्यांनी सांगितले.

– राष्ट्रपती राजवटीची केली मागणी

राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, अशी मागणी या घटनेनंतर खासदार सरकार यांनी केली आहे. राज्य सरकारने लोकशाहीला पायदळी तुडवले असून राज्यात कोणीही सुरक्षित नाही. म्हणूनच, राज्यातील सध्याची परिस्थिती थांबवण्यासाठी कलम 356 म्हणजेच राष्ट्रपती राजवट लागू करावी. अन्यथा हे सर्व थांबणार नाही, अशी मागणी जगन्नाथ यांनी केली आहे.

BJP MP Jagannath Sarkar, who came to see “The Kashmir Files”, was bombed in Bengal

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात