बीटकाॅईन गुन्हयातील सायबर तज्ञ आराेपींवरील एमपीआयडी कलम रद्द


  • सत्र न्यायालयाकडून केस प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारींकडे वर्ग

बिटकॉइन गैरव्यवहार प्रकरणी पाेलीसांनी दोन सायबर तज्ञांवर महाराष्ट्र ठेवीदार हितसंबंध कायदा (एमपीआयडी) कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. मात्र, यास बचाव पक्षाचे वकील राेहन नहार आणि अॅड.अमाेल डांगे यांनी आक्षेप घेत न्यायालयात अर्ज दाखल केल्यानंतर, न्यायालयाने आराेपीं वरील एमपीआयडी कायदा रद्द ठरवत सदर प्रकरण प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडे वर्ग केले आहे. Pune session court cancelled MPID act in Bitcoin fraud case..Now the case transferred to JMFC court


विशेष प्रतिनिधी

पुणे : बीटकाॅईन गुन्हयाचे तपासात पुणे सायबर पाेलीसांना सायबर तज्ञ म्हणून मदत करणाऱ्या पंकज घाेडे आणि माजी आयपीएस अधिकारी रविंद्र पाटील यांनी गाेपनीयतेचा भंग करुन गैरमार्गाने आराेपींच्या खात्यातील बीटकाॅईन त्यांच्या खात्यावर वर्ग केल्याचे उघडकीस आल्याने त्यांना अटक करण्यात आले आहे. पाेलीसांनी सदर दाेघांवर महाराष्ट्र ठेवीदार हितसंबंध कायदा (एमपीआयडी) कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. मात्र, यास बचाव पक्षाचे वकील राेहन नहार आणि अॅड.अमाेल डांगे यांनी आक्षेप घेत न्यायालयात अर्ज दाखल केल्यानंतर, विशेष सत्र न्यायाधीश एस.एस.गाेसावी यांचे न्यायालयाने आराेपीं वरील एमपीआयडी कायदा रद्द ठरवत सदर प्रकरण प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडे वर्ग केले आहे. आरोपींना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रद्धा डोलारे यांनी 25 मार्च पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

पंकज घाेडे आणि रविंद्र पाटील यांना १२ मार्च राेजी सायबर पाेलीसांनी अटक केली हाेती व त्यांची शनिवारी पाेलीस काेठडीची मुद्त संपुष्टात आल्यानंतर त्यांना सत्र न्यायालयात हजर करण्यात आले हाेते. मात्र, बचाव पक्षाचे वकील राेहन नहार यांनी आराेपींवर पाेलीसांनी लावलेल्या एमपीआयडी कायद्याला विराेध करत युक्तिवाद केला की, काेणत्याही ठेवीदारांचे पैसे आराेपींनी घेतल्याचा प्रकार घडलेला नसून तशाप्रकारचा काेणताही अर्ज पाेलीस अथवा न्यायालयाकडे आलेला नाही. त्यामुळे आराेपींचा एमपीआयडी कायदा रद्द करुन हे प्रकरण प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात वर्ग करण्यात यावे.



अमाेल डांगे युक्तिवादा दरम्यान म्हणाले, पाेलीसांचे मार्गदर्शनाखाली सदर गुन्हयाचा तपास झाला असून केवळ तज्ञ म्हणून पक्षकाराने काम केले आहे. पाेलीसांन समाेर बीटकाॅईन आराेपींच्या खात्यातून पाेलीसांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले असून त्याबाबतचे स्क्रीनशाॅट त्या त्यावेळी काढून देण्यात आल्याने त्यात खाडाखाेड करण्याचा प्रश्न नाही. बीटकाॅईनची चाेरी पाेलीसांनीच केली असून यासंर्दभात त्यांच्यावरच गुन्हा दाखल झाला पाहिजे.
सरकारी वकील मिलिंद वाडेकर यांनी प्रतिवाद करताना सांगितले की, आर्थिक गुन्हे शाखेच्या अपर पाेलीस महासंचालकांच्या सूचनेनुसार सदर गुन्हयाचा तपास करण्यात आला आहे. यात आराेपींनी माेठया प्रमाणात बीटकाॅईन गैरव्यवहार केल्याचे निर्देशनास आले आहे. पाेलीसांना बीटकाॅईन बाबतची माहिती नव्हती याकरिता तज्ञांची मदत घेण्यात आली हाेती. मात्र, आराेपींनी परस्पर बीटकाॅईन त्यांच्या खात्यात वर्ग केले आहे.

आराेपी पंकज घाेडे याच्या ब्लाॅकचेन वेबसाईटची पाहणी करता, पाेलीस वाॅलेटवर वळविलेली क्रिप्टाे करन्सी व्यतिरिक्त इतरही काही संशयित वाॅलेटवर रक्कम वळविलेली आहे. अटक आराेपींनी सदर गुन्हयातील आराेपींचे क्रिप्टाे करन्सी वाॅलेटवर नियंत्रण मिळवून त्याद्वारे गैरव्यवहार केला आहे.क्रिप्टाे करन्सी वेगवेगळया मार्गाने विदेशात पाठवून तेथून विविध मार्गाने ती मालमत्ता भारतात आणली आहे. रविंद्र पाटील याचे विविध क्रिप्टाे करन्सी वाॅलेट मधून एक काेटी दहा लाखांचे क्रिप्टाे करन्सी जप्त करण्यात आल्या आहे.

Pune session court cancelled MPID act in Bitcoin fraud case..Now the case transferred to JMFC court

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात