प्रतिक्रियेची घाई, सुप्रिया सुळे यांना अडचणीत नेई, एमआयएमचे कौतुक करणे पडले महागात


विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुत्सदी राजकारण्याचे गुण राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यात नसल्याची पुन्हा एकदा टीका होऊ लागली आहे. घाईघाईत प्रतिक्रिया देण्याची त्यांची सवय अडचणीची ठरत असल्याचे पक्षात बोलले जाऊ लागले आहे. त्यामुळे एमआयएम पक्षासोबत आघाडीवरील त्यांच्या प्रतिक्रियेनंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना खुलासा करावा लागला.Haste of reaction, Supriya Sule gets in trouble, MIM has to be appreciated

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासोबत एमआयएमचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांची नुकतीच चर्चा झाली. या चर्चेदरम्यान त्यांनी राष्ट्रवादीशी युती करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. याबाबत सुप्रिया सुळे यांना विचारले असता त्यांनी सकारात्मक उत्तर दिलं.



त्या म्हणाल्या, राजकीय प्रश्नांवर कुणाला एकत्र काम करायचं असेल, समविचारी पक्षांना एकत्र यायचं असेल तर ही आनंदाची गोष्ट आहे. विकास कामासाठी सगळे एकत्र येणार असतील आणि राज्याचे भले होणार असेल तर ही चांगली गोष्ट आहे. कुठल्याही राज्याला ते हवंच आहे. एमआयएमशी युतीबाबत राष्ट्रवादी अनुकूल असल्याचा अर्थ त्यांच्या या वक्तव्यातून काढला जात आहे.

त्यांच्या या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुलासा करावा लागला. सुप्रिया सुळे यांनी अशीच घाईघाईत प्रतिक्रिय अजित पवार यांच्या बंडाच्या वेळी दिली होती. पहाटेच्या शपथविधीनंतर त्यांनी सकाळी सकाळीच पक्ष आणि कुटुंबात फुट पडल्याचे ट्विट केले होते. त्यानंतर राज्यात राजकारण घडले. राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांत संभ्रम निर्माण झाला.

Haste of reaction, Supriya Sule gets in trouble, MIM has to be appreciated

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात