मोठा दहशतवादी हल्ला, पाणीटंचाईमुळे भारत- पाकमध्ये पाच वर्षांत युद्ध भडकणार , अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेचा अहवाल


वृत्तसंस्था

न्यूयॉर्क : भारत आणि पाकिस्तानमध्ये येत्या पाच वर्षात मोठे युद्ध होईल, असा इशारा अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेने दिला आहे. पाकिस्तानातून भारतावर एक मोठा दहशतवादी हल्ला होईल. तसेच दोन्ही देशांत विशेषतः पाकिस्तानात 2025 मध्ये पाणीटंचाई जाणवू लागेल. या दोन कारणांमुळे दोन्ही देशात युद्धाचा भडका उडू शकतो, असे अहवालात म्हंटले आहे. Major terror attack, water scarcity could spark Indo-Pak war in five years, US intelligence report



अमेरिकेच्या नॅशनल इंटेलिजन्स कौन्सिलने ग्लोबल ट्रेंड रिपोर्ट हा अमेरिकेन सरकारला सादर केला आहे. त्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध भडकण्याची शक्यता वर्तविली आहे. या वृत्ताने पाकिस्तानात खळबळ उडाली असून भारतात त्याचे तेवढे पडसाद उमटललेले नाहीत.

पाकिस्तानने देशातील संभाव्य पाणीटंचाईबाबत कोणत्याही उपाययोजना राबविलेल्या नाहीत. त्याचा फटका 2025 पर्यंत पाकिस्तानला बसणार आहे. तसेच दहशतवादाला घातलेले खतपाणी यामुळे आता दहशतवादाचे रोपटे 2025 पर्यंत मोठे होणार आहे. त्यातून भारतावर दहशतवादी मोठा हल्ला करतील. त्याला भारताकडून चोख प्रत्युत्तर दिले जाईल. त्यातून दोन्ही देशात मोठे युद्ध भडकेल, असा इशारा रिपोर्टमध्ये दिला आहे. अर्थात अणुयुद्धाचा धोका नसेल, असा अंदाज वर्तविल्यामुळे दोन्ही देशातील नागरिकांचा जीव भांड्यात पडला आहे.

Major terror attack, water scarcity could spark Indo-Pak war in five years, US intelligence report

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात