वेगळा झालेला पाकिस्तान संकटात, अखंड भारत पाकिस्तानसाठीही चांगला ठरू शकतो, मोहन भागवत यांचे प्रतिपादन

भारतापासून वेगळा झालेला पाकिस्तान आताच्या घडीला संकटात आहे. त्यामुळे अखंड भारत पाकिस्तानसाठीही चांगला ठरू शकतो, असे प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे. Separated Pakistan in crisis, united India can be good for Pakistan too, asserts Mohan Bhagwat


विेशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारतापासून वेगळा झालेला पाकिस्तान आताच्या घडीला संकटात आहे. त्यामुळे अखंड भारत पाकिस्तानसाठीही चांगला ठरू शकतो, असे प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे.

एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमावेळी अखंड भारताविषयी मोहन भागवत यांनी आपले विचार व्यक्त केले. सरसंघचालक म्हणाले की, अखंड भारत हा जबरदस्तीने किंवा बळाचा वापर करून नाही, तर हिंदू धर्माच्या माध्यमातून करणे अधिक संयुक्तिक ठरेल.जगत्कल्याणासाठी गौरवशाली अखंड भारताची आवश्यकता आहे. यासाठी देशभक्ती मोठ्या प्रमाणात जागृत करणे गरजेचे आहे. फाळणी झालेला भारत पुन्हा एकदा अखंड करणे काळाची गरज आहे. जे भारताला आता स्वत:चा भाग मानत नाही, त्यांना तर अधिक गरज आहे, असे भागवत म्हणाले.

भागवत म्हणाले की, भारताची फाळणी झाली, त्याच्या सहा महिन्यांपूर्वी असे कधी घडेल, याचा विचार कोणी स्वप्नातही केला नव्हता. फाळणी हे मुर्खांचे स्वप्न आहे, अशी प्रतिक्रिया जवाहरलाल नेहरू यांनी त्यावेळी दिली होती. मात्र, तरीही फाळणी झाली. तेव्हा फाळणी झाली असली, तरी आताच्या घडीला अखंड भारत शक्य आहे. गंधार अफगाणिस्तान झाले. त्या क्षेत्रात शांतता नांदत आहे का? भारताची फाळणी करून पाकिस्तानची निर्मिती करण्यात आली. तेथेही शांतता नांदत नाही. भारत अनेक आव्हानांना सामोरा जाण्यास सक्षम आहे. वसुधैव कुटुंबकमच्या माध्यमातून जगात आनंद आणि शांतता प्रस्थापित केली जाऊ शकते.

Separated Pakistan in crisis, united India can be good for Pakistan too, asserts Mohan Bhagwat

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*