उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथांनी करून दाखविले, शनिवारी कोरोनाने एकही मृत्यू नाही, केवळ ३२ नवे रुग्ण सापडले, महाराष्ट्र, केरळने घ्यावा आदर्श


विशेष प्रतिनिधी

लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कोरोनाविरुध्दच्या लढाईत इतिहास घडविला आहे. शनिवारी उत्तर प्रदेशात कोरोनाने एकही मृत्यू झालेला नाही. संपूर्ण राज्यात केवळ ३२ नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत.In Uttar Pradesh, Yogi Adityanath performed, there was no death from corona on Saturday, only 32 new patients were found, Maharashtra, Kerala should take the ideal

देशातील प्रगत म्हणविल्या जाणाºया केरळ, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये अद्यापही कोरोनाला रोखण्यात यश आलेले नसताना उत्तर प्रदेशात मात्र हा चमत्कार घडला आहे.उत्तर प्रदेशात शनिवारी कोविड -19 मुळे कोणत्याही मृत्यूची नोंद झाली नाही, तर 32 नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत,



असे अधिकाºयांनी सांगितले. राज्यात आत्तापर्यंत एकूण 17,08,441 जणांना कोरोना झाला आहे. 22,756 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांमध्ये, राज्यात 48 कोविड -19 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, ज्यामुळे बरे झालेल्यांची एकूण संख्या 16,84,973 झाली आहे.

सध्या राज्यात केवळ 712 सक्रिय रुग्ण आहेत. विशेष म्हणजे गेल्या २४ तासांत २.५१ लाख नमुन्यांची चाचणी घेण्यात आली आहे. त्यामध्ये केवळ ३२ नवे रुग्ण सापडल्याने पॉझिटिव्हीटी रेट अत्यंत कमी झाला आहे.

कोरोना रुग्णांच्या मृत्यूवरून आत्तापर्यंत उत्तर प्रदेशची बदनामी केली जात आहे. मृत्यू लपविण्यासाठी गंगेमध्ये सोडले जात असल्याचेही आरोप झाले. मात्र, उत्तर प्रदेश सरकारने काम करून विरोधकांना उत्तर दिले आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे.

कोरोनावर उपाययोजनेसाठी उत्तर प्रदेशात युध्दपातळीवर प्रयत्न केले जात आहे. काही लाख आरोग्य कर्मचारी गावोगावी फिरत आहेत. स्वत: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ प्रत्येक जिल्ह्याचा दौरा करत आहेत. त्यामुळे अधिकारीही सक्रीय झाले आहेत. त्याचे प्रत्यंतर कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊन येत आहे.

In Uttar Pradesh, Yogi Adityanath performed, there was no death from corona on Saturday, only 32 new patients were found, Maharashtra, Kerala should take the ideal

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात