वृत्तसंस्था
बंगळुरू : कर्नाटकमधील चमराजनगरमध्ये जिल्हा शासकीय रुग्णालयात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे 24 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मात्र, तब्येत बिघडल्यामुळे हे मृत्यू झाले आहेत, असे रुग्णालय प्रशासनाने सांगितले आहे.In Karnataka, 24 corona patients died due to lack of oxygen, due to ill health; The hospital claims
वृत्तवाहिन्यांच्या माहितीनुसार, रुग्णालयातील दृश्यांवरून स्पष्ट होत आहे की, प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे 24 लोकांचा जीव गेला आहे. संपूर्ण घटनेनंतर 60 ऑक्सिजन सिलिंडर रुग्णालयात दाखल झाले आहेत.
या घटनेनंतर मुख्यमंत्री बीएस येदियुरप्पा यांनी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली. दुसरीकडे विरोधी पक्ष काँग्रेसने हा मुद्दा लावून धरत येडियुरप्पा यांच्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच कोरोना संकट रोखण्यासाठी सरकारकडे प्लान नाही, अशी टीकाही केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App