कर्नाटकात १४ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर ; उद्यापासून लागू ; चार तास अत्यावश्यक सेवा


वृत्तसंस्था

बंगळुरू : कर्नाटकात 14 दिवसांसाठी लॉकडाऊन जाहीर केला आहे. केवळ अत्यावश्यक सेवा सकाळी चार तास वगळता राज्यात सर्व बंद राहील, अशी घोषणा मुख्यमंत्री बी. एस. येडियूरप्पा यांनी आज केली.Karnataka announces 14-day lockdown;Applicable from tomorrow; Four hours of essential service

राज्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असून या संकटावर मात करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. कर्नाटकात 27 एप्रिल रात्री 9 वाजल्यापासून ते 10 मे पर्यंत हा लॉकडाऊन असेल.


कर्नाटकात मुख्यमंत्री येडीयुरप्पांविरोधात खदखद; ग्रामविकासमंत्री ईश्वरप्पांचे राज्यपालांना पत्र; मुख्यमंत्री अधिकारशाही गाजवत आहेत!!


 

दररोज सकाळी 6 ते 10 या वेळेत अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. बस वाहतूक पूर्ण बंद राहणार आहे. मद्याची दुकाने पार्सल सेवेसाठी सुरू ठेवली आहे. 18 ते 45 वयोगटातील लोकांना कोरोनाची मोफत लस देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली .

औद्योगिक क्षेत्रातील आस्थापने सुरु राहतील. कापड दुकाने बंद राहणार असून बांधकाम क्षेत्र मात्र सुरु ठेवले जाणार आहे.

Karnataka announces 14-day lockdown;Applicable from tomorrow; Four hours of essential service

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था