Mission Vayu : भारताला तातडीने १० हजार ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पुरवण्यासाठी अमेझॉनचा पुढाकार

Mission Vayu : Amazon bringing 10,000 oxygen concentrators and BiPAP machines into India

Mission Vayu : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेविरुद्ध मदतीसाठी अॅमेझॉन इंडियाने पुढाकार घेतला आहे. अॅमेझॉनने कोविड रिस्पॉन्ससाठी ACT ग्रँट, टेमासेक फाउंडेशन, पुणे आणि इतरांशी भागीदारा केली आहे. याद्वारे 8000 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आणि 500 BiPAP मशीन्स सिंगापूरमधून भारतात तत्काळ एटरलिफ्ट करण्यात येणार आहेत. ही महत्त्वाची उपकरणे भारतात आणण्याच्या कामी वेग आणण्यासाठी यात सहभागी सर्व संघटना भारत सरकारसोबत मिळून काम करत आहेत. ही सर्व वैद्यकीय उपकरणे देशातील अनेक रुग्णालयांना दान करण्यात येणार असून यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची मोठी मदत होणार आहे. Mission Vayu : Amazon bringing 10,000 oxygen concentrators and BiPAP machines into India


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेविरुद्ध मदतीसाठी अमेझॉन इंडियाने पुढाकार घेतला आहे. अमेझॉनने कोविड रिस्पॉन्ससाठी ACT ग्रँट, टेमासेक फाउंडेशन, पुणे आणि इतरांशी भागीदारा केली आहे. याद्वारे 8000 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आणि 500 BiPAP मशीन्स सिंगापूरमधून भारतात तत्काळ एटरलिफ्ट करण्यात येणार आहेत. ही महत्त्वाची उपकरणे भारतात आणण्याच्या कामी वेग आणण्यासाठी यात सहभागी सर्व संघटना भारत सरकारसोबत मिळून काम करत आहेत. ही सर्व वैद्यकीय उपकरणे देशातील अनेक रुग्णालयांना दान करण्यात येणार असून यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची मोठी मदत होणार आहे.

अमेझॉन या ऑक्सिजन कंसंट्रेटर्स आणि BiPAP यंत्रांना एअरलिफ्ट करण्याचा खर्च उचलणार आहे. ही यंत्रे ACT ग्रांट आणि PPCR सहित अनेक फंड्समधून खरेदी करण्यात येणार आहेत. ही यंत्रे सिंगापूरहून भारतात एअर इंडिया तसेच इतर अनेक आंतरराष्ट्रीय कॅरिअर्सच्या मदतीने आणण्यात येणार आहेत. याशिवाय अमेझॉन ही उपरकरणे भारतात आल्यावर विमानतळापासून ते निश्चित रुग्णालयांपर्यंतच्या त्यांच्या वाहतुकीचीही जबाबदारी सांभाळणार आहे. या उपकरणांची पहिली खेप मुंबईत 25 एप्रिल रोजी आली असून या प्रकल्पातील महत्त्वाचा भाग 30 एप्रिलपर्यंत भारतात येईल.

यासंदर्भात अमेझॉन इंडियाचे कंट्री हेड अमित अग्रवाल म्हणाले की, कोरोना महामारीने भारताला अकल्पनीय पद्धतीने गंभीररीत्या प्रभावित केले आहे. आम्ही देशासोबत मजबुतीने उभे आहोत. देशाच्या तात्कालिक गरजांच्या पुरवठ्यासाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर महत्त्वाचे आहे. यामुळे ते तत्काळ एअरलिफ्ट करून देशाला मदत करण्यात येत आहे. या महामारीच्या काळात पुढेही आम्ही वेगवेगळ्या मार्गांनी देशाला मदत करत राहणार आहोत. जीवन वाचवण्यासाठी आम्ही प्रतिबद्ध आहोत.

याव्यतिरिक्त, अमेझॉन इंडिया 1500 हून जास्त ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर्स आणि इतर महत्त्वाची वैद्यकीय उपकरणांचीही खरेदी करत आहे. ही उपकरणे अनेक नॉन प्रॉफिट संस्था उदा. स्वस्थ, कन्सर्न इंडिया आणि अॅक्ट ग्रँट्स व सत्त्व कन्सल्टिंगसोबत भागीदारी करून देशातील रुग्णालयांना दान करण्यात येतील.

Mission Vayu : Amazon bringing 10,000 oxygen concentrators and BiPAP machines into India

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात