पुण्यातील गोडबोले कुटुंबातील तीन भावांचा कोरोनामुळे मृत्यू


वृत्तसंस्था

पुणे : पुण्यातील गोडबोले कुटुंबातील तीन भावांचा कोरोनामुळे नुकताच मृत्यू झाला. सदाशिव पेठेत हे कुटुंब राहते. वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि सराफी व्यवसायात ते होते. Three brothers of Godbole family in Pune die due to corona

प्रसिद्ध पॅथालॉजिस्ट आणि गोडबोले लॅबचे संचालक डॉ. रमेश गोडबोले, इंजिनीअर आणि जर्मन भाषा शिक्षक अरविंद गोडबोले, सोने-चांदी आणि सराफी व्यावसायिक विश्वनाथ तथा दादा गोडबोले, अशी त्यांची नावे आहेत. त्यांचा एप्रिलमध्ये एकापाठोपाठ मृत्यू झाला.



डॉ. रमेश गोडबोले हे सर्वांत धाकटे बंधू. ते अलका टॉकीजच्या जवळ गोडबोले लॅबोरेटरीजचे संचालक होते. मधुमित्र मासिकाचे 30 वर्षं ते संपादक होते. निसर्गसेवक स्वयंसेवी संस्थांचे संस्थापक सदस्य आणि अध्यक्ष  होते. कोथरूडमधलं स्मृतिवन सुरू करण्यात मोठा वाटा होता. 23 एप्रिलला त्यांचे निधन झालं. ते 80 वर्षांचे होते.

Maharashtra Corona Updates : More than 63,000 patients discharged in 24 hours, Mumbai Records Low Number of patients today

मधले बंधू अरविंद गोडबोले यांनी इंजिनीअरिंगची पदवी मिळवल्यानंतर जर्मनीत शिष्यवृत्ती मिळवली. काही वर्षं जर्मनीला राहिल्यानंतर ते भारतात परतले आणि पुण्यात किर्लोस्करमध्ये नोकरी केली. पुणे विद्यापीठात 20 वर्षं जर्मन भाषेचं शिक्षण ते देत होते. उत्सव कार्यालय त्यांनी सुरू केलं होतं. 12 एप्रिलला त्यांना मृत्यू झाला. ते 86 वर्षांचे होते.

ज्येष्ठ बंधू विश्वनाथ गोडबोले हे वडिलोपार्जित सराफी व्यवसाय करत होते. महाराष्ट्र बँकेत वरिष्ठ अधिकारी पदावरही होते. त्यांचे 90 व्या वर्षी 17 एप्रिलला निधन झालं.

Three brothers of Godbole family in Pune die due to corona

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात