अमेरिकेने मदतीची जाण ठेवली, भारताला कोरोना लसीसाठी कच्चा माल पुरविण्यास दिली मान्यता


भारताने पहिल्या लाटेत केलेल्या मदतीची जाण ठेऊन अमेरिकेने अखेर भारताला कोरोना प्रतिबंधक लसीच्या उत्पादनासाठी कच्चा माल देण्यासह इतरही मदत देण्याचे मान्य केलेआहे. अमेरिकेचे सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांनी भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना ही माहिती दिली. त्यामुळे पुन्हा एकदा लस निर्मितीला जोर येणार आहे. The US was aware of the help, allowing India to supply raw materials for the corona vaccine


विशेष प्रतिनिधी 

नवी दिल्ली : भारताने पहिल्या लाटेत केलेल्या मदतीची जाण ठेऊन अमेरिकेने अखेर भारताला कोरोना प्रतिबंधक लसीच्या उत्पादनासाठी कच्चा माल देण्यासह इतरही मदत देण्याचे मान्य केलेआहे. अमेरिकेचे सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांनी भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना ही माहिती दिली. त्यामुळे पुन्हा एकदा लस निर्मितीला जोर येणार आहे.

लसींच्या निर्मितासाठी कच्च्या मालाचा तुटवडा निर्माण झाला असल्याची माहिती सिरम इन्स्टिट्युटचे सीईओ अदर पुनावाला यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती. अमेरिका आणि युरोपने पुरवठा थांबवला असल्याचे त्यांनी सांगितले होते. . अद्यापही कच्च्या मालाचा पुरवठा होत नसल्याने अदर पुनावाला यांनी थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनाच हात जोडून विनंती केली होती. त्यानंतर अमेरिकेवर दबाव वाढू लागला होता. अखेर अमेरिकेना भारताची मागणी मान्य केली असून लवकरच लसी निर्मितीसाठी कच्चा मालाचा पुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे लस निर्मितीची अडचण दूर होणार आहे.सीरम इन्स्टिट्युटतर्फे कोविशिल्ड लसीचं उत्पादन केलं जात आहे. सध्या महिन्याला ६ ते ६.५ कोटी डोसचं उत्पादन सीरमच्या पुण्यातील प्लांटमध्ये सुरू असून ते १० ते ११ कोटींपर्यंत नेण्याचं ध्येय या वर्षी जूनपर्यंत गाठण्याचा संकल्प अदर पूनावाला यांनी यावेळी बोलून दाखवला होता.

गेल्या वर्षी अमेरिकेत करोनाची भीषण लाट आली होती. तेव्हा भारताने हाय़ड्रॉस्किक्लोरिक्वीन भारतातून अमेरिकेला पाठवली होती. त्यावेळी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला विनंती केली होती. भारताने तात्काल विनंतीला मान देत कोट्यवधी गोळ्यांचा पुरवठा केला होता. मात्र, त्याची जाण न ठेवता अमेरिकेतील जनतेला आमचे प्राधान्य म्हणत त्यांनी कच्चा मालाचा पुरवठा बंद केला होता. मात्र, आता या कच्चा मालाबरोबरच व्हेंटिलेटर, पीपीई किट आणि इतर साहित्यही भारताला देणार असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.

इंग्लंडकडूनही मिळणार मदत

भारतातील कोरोना रुग्णांवर उपचारासाठी आता इंग्लंडनेही मदतीचे आश्वासन दिले आहे. ६०० पेक्षा अधिक वैद्यकीय उपकरणं भारतात पाठवत आहे. या उपकरणांमध्ये ऑक्सिनज कंसंट्रेटर आणि व्हेंटिलेटर्सचा देखील समावेश आहे.

इंग्लंडचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी म्हटले आहे की, आम्ही एक मित्राच्या नात्याने आणि करोनाविरोधातील लढाईतील सहकारी म्हणून भारतासोबत उभा आहोत. या संकट काळात आम्ही भारत सरकारसोबत राहून काम करत राहू.

अमेरिका, फ्रान्स, युरोप, ऑ स्ट्रेलिया, चीन, पाकिस्तान, सिंगापूर, युएई या देशांनी आत्तापर्यंत भारताला मदत करण्याचं धोरण जाहीर केलं असून त्यासाठी सक्रीय पुढाकार देखील घेतला आहे. भारतात करोनाचा वेगाने प्रसार होऊ लागला असून शक्य ती सर्व मदत देण्याचं आश्वासन या देशांकडून दिलं जाऊ लागलं आहे. त्यामुळे भारताला करोनाविरोधातलं युद्ध लढण्यासाठी मदत मिळू शकेल, असा सूर जागतिक पटलावर उमटू लागला आहे.

The US was aware of the help, allowing India to supply raw materials for the corona vaccine


महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती