सिंहगड रोड पोलिसांचा कोरोनाच्या जागृतीसाठी गाण्यांचा अनोखा फंडा


वृत्तसंस्था

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिंहगड रोड पोलिसांनी सोसायट्यांमध्ये जाऊन गाण्यातून जनजागृतीवर करण्यावर भर दिला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक देवीदास घेवारे सहकाऱ्यांसमवेत हातामध्ये माइक घेऊन गाणे सादर करत आहेत. मास्क पेहनो भाई… हात जोडता हूँ… तेरे पैर पडता हूँ ! , अशी साद घालत आहेत. Sinhagad Road Police Corona A unique fund of songs for awareness

कोरोना साखळी तोडण्यासाठी मास्कचा वापर, वारंवार हात धुणे, सॅनिटायझरचा वापर करावा, यासाठी प्रबोधन करण्यासाठी सिंहगड पोलिसांनी पुढाकार घेतला आहे.



त्यासाठी सोसायट्यांसह मुख्य चौकामध्ये ध्वनिक्षेपकावर गाणी गाऊन लोकांना कोरोना नियमावलीचे महत्त्व पटवून देत आहेत. वरिष्ठ पोलिस निरीक्षक देवीदास घेवारे यांच्यासह सहायक पोलिस उपनिरीक्षक प्रमोद कळमकर यांनी नवले ब्रीज, वडगाव ब्रीजसह मोठ्या चौकांमध्ये गाण्यांतून जागृती केली.

सोसायट्यांमधील रहिवासी, रस्त्यावर बाहेर फिरणाऱ्या नागरिकांना हात जोडून मास्क वापरण्याची विनंती करण्यात आली. रहिवाशांकडून टाळ्या वाजवून गाण्यांना प्रतिसाद दिला. पोलिसांच्या उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत केले आहे.

Sinhagad Road Police Corona A unique fund of songs for awareness


महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात