Corona Climbs Everest : जगातील सर्वोच्च शिखरावरही पोहोचला कोरोना, माउंट एव्हेरस्टवर पहिला रुग्ण

Corona climbs Everest first Covid patient Found On worlds highest peak Mount Everest

Corona Climbs Everest : कोरोना महामारीने अवघ्या जगाला संकटात टाकले आहे. असा कोणताही देश नाही की, जिथे कोरोनाचा रुग्ण नाही. आता तर जगातील सर्वोच्च शिखर असलेल्या माउंट एव्हरेस्टवरही कोरोना संक्रमणाचे प्रकरण समोर आले आहे. माउंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्पमध्ये थांबलेल्या नॉर्वेच्या एका गिर्यारोहकाला संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांना हेलिकॉप्टरच्या साहाय्याने काठमांडूमधील एका रुग्णालयात नेण्यात आले. Corona climbs Everest first Covid patient Found On worlds highest peak Mount Everest


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कोरोना महामारीने अवघ्या जगाला संकटात टाकले आहे. असा कोणताही देश नाही की, जिथे कोरोनाचा रुग्ण नाही. आता तर जगातील सर्वोच्च शिखर असलेल्या माउंट एव्हरेस्टवरही कोरोना संक्रमणाचे प्रकरण समोर आले आहे. माउंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्पमध्ये थांबलेल्या नॉर्वेच्या एका गिर्यारोहकाला संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांना हेलिकॉप्टरच्या साहाय्याने काठमांडूमधील एका रुग्णालयात नेण्यात आले. बाधित गिर्यारोहकाने सांगितले की, त्यांना 15 एप्रिल रोजी कोरोना विषाणूची लागण झाली. आता गुरुवारी झालेल्या तपासणी त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. ते म्हणाले की ते सध्या नेपाळमधील एका स्थानिक कुटुंबासोबत राहत आहेत.

या घटनेनंतर अनुभवी ऑस्ट्रियन गाइड ल्यूकास फर्नबॅश यांनी हा इशारा दिला की, हे संकट किती मोठे आहे हे स्पष्ट होते. ते म्हणाले की, जर सर्वांची चाचणी करून खबरदारी घेतली गेली नाही, तर बेस कॅम्पवरील हजारो गिर्यारोहक, गाइड आणि मदतनिसांमध्ये संसर्ग पसरू शकतो.

ते म्हणाले की, गिर्यारोहणासाठी मे महिना हा सर्वोत्तम काळ असतो. परंतु संसर्गाच्या प्रसारामुळे हा सीझन हातचा निघून जाण्याची भीती आहे. सध्या आपत्कालीन परिस्थितीत बेस कॅम्पवर मोठ्या प्रमाणात टेस्टिंग करणे गरजेचे आहे. सर्वांची टेस्टिंग झाली पाहिजे.”

फर्नबॅश म्हणाले की, संसर्ग रोखण्यासाठी त्याचा प्रसार थोपवण्यासाठी सर्व गिर्यारोहक पथकांना वेगवेगळे ठेवले पाहिजे. त्यांच्यात कोणताही संपर्क नसावा. ही पावले तातडीने उचलली नाहीत, तर परिस्थिती हाताबाहेर जाईल.”

Corona climbs Everest first Covid patient Found On worlds highest peak Mount Everest

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात