हुर्रे …! वैज्ञानिकांनी तयार केला ‘ऑक्सिकॉन’, दर मिनिटाला तयार होणार 3 लिटर ऑक्सिजन


  • पीटीआयच्या अहवालानुसार, भोपाळ, मध्य प्रदेशातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च (IISER) च्या संशोधकांनी हे स्वस्त ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर विकसित केले.

विशेष प्रतिनिधी 

नवी दिल्लीः देशात ऑक्सिजन संकट सुरू असताना एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारतीय वैज्ञानिकांनी अत्यंत स्वस्तात एक ऑक्सिजन कॉन्संट्रेटर तयार केलंय. त्याची किंमत देखील जास्त नाही आणि यामुळे ऑक्सिजन वेगाने तयार होते. पीटीआयच्या अहवालानुसार, भोपाळ, मध्य प्रदेशातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च (IISER) च्या संशोधकांनी हे स्वस्त ऑक्सिजन कॉन्संट्रेटर विकसित केले. Scientists  created ‘Oxycon’, will produce 3 liters of oxygen per minute

विकसित केलेल्या या केंद्रामध्येही कमतरता दूर करण्याची क्षमता
संशोधकांच्या म्हणण्यानुसार, कोरोना साथीच्या सद्यस्थितीच्या परिस्थितीत वैद्यकीय ऑक्सिजनची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी हे केंद्र महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते. अशा वेळी जेव्हा बर्‍याच राज्यांमधील रुग्णालयांमधून ऑक्सिजनची कमतरता असल्याची बातमी येते आणि त्यासाठी सर्वांकडून ऑक्सिजन वाढवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. तेव्हा वैज्ञानिकांनी विकसित केलेल्या या केंद्रामध्येही कमतरता दूर करण्याची क्षमता आहे.

किंमत फक्त 20 हजार

संशोधकांच्या म्हणण्यानुसार, या डिव्हाइसला ऑक्सिकॉन असे नाव देण्यात आलेय, ज्याची किंमत 20 हजारांपेक्षा कमी आहे. हे ऑक्सिकॉन प्रति लिटर दराने 93 ते 95 टक्के शुद्ध ऑक्सिजन वितरीत करू शकते. संशोधकांच्या म्हणण्यानुसार, ऑक्सिजन तयार करण्यासाठी उपलब्ध असलेल्या उपकरणांची किंमत 60 ते 70 हजार रुपये आहे. परंतु याची किंमत तुलनेने कमी आहे. साथीच्या दुसर्‍या लाटेदरम्यान ऑक्सिजनच्या कमतरतेवर मात करण्यासाठी तो एक उपाय म्हणून विकसित केला गेलाय.

Scientists  created ‘Oxycon’, will produce 3 liters of oxygen per minute

 

 

 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात