वृत्तसंस्था
वॉशिंग्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नुकत्याच झालेल्या अमेरिका दौऱ्यानंतर उत्तर कॅलिफोर्नियातील एका सफरचंदाच्या व्हरायटीला मोदींचे नाव देण्यात आले आहे. मुख्य म्हणजे सफरचंदाची ही व्हरायटी इटालियन आहे…!!Great news : After the recent successful US visit of India’s PM Modi, an apple variety has been named after him in California.
रंगाला गुलाबी लालसर, क्रंची आणि चवीला अतिशय गोड असलेल्या या सफरचंदाच्या व्हरायटीला उत्तर कॅलिफोर्नियातील उत्पादकांनी मोदींचे नाव दिले आहे. पण नेमके इटालियन सफरचंदाच्या व्हरायटीला मोदींचे नाव दिले गेल्यामुळे त्याच्यावर सोशल मीडियात वेगळ्या चर्चा देखील सुरू आहेत. अनेकांनी त्याच्यावर मीम्स बनवायला सुरुवात केली आहे.
अमेरिकेतल्या इटालियन व्हरायटीच्या मोदी सफरचंदाचा आस्वाद भारतातल्या काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी घेतील का?, त्यांनी आस्वाद घेतला तर त्यांना ते सफरचंद गोड लागेल का?, असे मिश्किल सवाल सोशल मीडियातून करण्यात येत आहेत. पण एकूण उत्तर कॅलिफोर्नियातील सफरचंद उत्पादकांनी मोदींचा सन्मान राखण्यासाठी तसेच आपल्या सफरचंदाचा ब्रँड लोकप्रिय होण्यासाठी मोदींचे नाव त्याला दिल्याचे स्पष्ट होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App