सीएम केजरीवाल यांची पंतप्रधान मोदींना मागणी, या वर्षी डॉक्टरांना देण्यात यावा भारतरत्न

CM Arvind Kejriwal Demands PM Modi To Give Bharat Ratna Award To Doctors And Health Workers This Year

CM Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कोरोना साथीच्या वेळी आपला जीव धोक्यात घालणार्‍या डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना देशाचा सर्वोच्च सन्मान भारतरत्न देण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले की, कोरोनाविरुद्ध युद्धादरम्यान प्राण गमावलेल्या डॉक्टरांना ही खरोखर श्रद्धांजली असेल. यासाठी केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून आपली मागणी कळवली आहे. CM Arvind Kejriwal Demands PM Modi To Give Bharat Ratna Award To Doctors And Health Workers This Year


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कोरोना साथीच्या वेळी आपला जीव धोक्यात घालणार्‍या डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना देशाचा सर्वोच्च सन्मान भारतरत्न देण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले की, कोरोनाविरुद्ध युद्धादरम्यान प्राण गमावलेल्या डॉक्टरांना ही खरोखर श्रद्धांजली असेल. यासाठी केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून आपली मागणी कळवली आहे.

यासंदर्भात केजरीवाल यांनी रविवारी ट्विट केले की, या वर्षी ‘भारतीय डॉक्टर’ला भारतरत्न मिळाला पाहिजे. ‘भारतीय डॉक्टर’ म्हणजे सर्व डॉक्टर, नर्स आणि पॅरामेडिक्स. शहीद डॉक्टरांना ही खरी श्रद्धांजली ठरेल. जे त्यांचे जीवन आणि कुटुंबाची चिंता न करता सेवा करतात त्यांच्यासाठी हा सन्मान असेल. यामुळे संपूर्ण देश आनंदी होईल.

जूनच्या मध्यात इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) दिलेल्या आकडेवारीनुसार कोरोना विषाणूच्या साथीच्या दुसर्‍या लाटेमध्ये एकूण 730 डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. कोविडमुळे बिहारमधील सर्वाधिक 115 डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे, तर दिल्लीत 109, उत्तर प्रदेशात 79, पश्चिम बंगालमध्ये 62, राजस्थानात 43, झारखंडमध्ये 39 आणि आंध्र प्रदेशातील 38 डॉक्टरांचा मृत्यू महामारीमुळे झाला आहे. आयएमएच्या म्हणण्यानुसार, देशात कोविड साथीच्या पहिल्या लाटेच्या वेळी 748 डॉक्टरांचा मृत्यू झाला होता.

CM Arvind Kejriwal Demands PM Modi To Give Bharat Ratna Award To Doctors And Health Workers This Year

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात