भाजप नेत्यांशी भेटीवर संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्राचे राजकारण भारत-पाकिस्तानसारखे नाही

Sanjay Raut Denies meetgin With Ashish Shelar Says Maharashtra politics is not like India-Pakistan relation

Sanjay Raut Denies meeting With Ashish Shelar :  शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि भाजप नेते आशिष शेलार यांच्या गुप्त भेटीच्या बातमीने विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. रविवारी संजय राऊत यांनी शेलारांशी झालेल्या भेटीला अफवा म्हणून संबोधले. ते म्हणाले की, शनिवारी मी शेलार यांना भेटलो नाही. पुढे ते म्हणाले, महाराष्ट्राचे राजकारण हे भारत-पाकिस्तान संबंधांसारखे नाही, हे लोकांना समजून घ्यायला हवे. Sanjay Raut Denies meetgin With Ashish Shelar Says Maharashtra politics is not like India-Pakistan relation


वृत्तसंस्था

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि भाजप नेते आशिष शेलार यांच्या गुप्त भेटीच्या बातमीने विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. रविवारी संजय राऊत यांनी शेलारांशी झालेल्या भेटीला अफवा म्हणून संबोधले. ते म्हणाले की, शनिवारी मी शेलार यांना भेटलो नाही. पुढे ते म्हणाले, महाराष्ट्राचे राजकारण हे भारत-पाकिस्तान संबंधांसारखे नाही, हे लोकांना समजून घ्यायला हवे.

आशिष शेलार यांच्याबद्दल बोलताना संजय राऊत म्हणाले की, मी भाजप नेते आशिष शेलार यांना भेटलो नाही. आम्ही एका सामाजिक कार्यक्रमात खूप पूर्वी भेटलो होतो. उद्यापासून म्हणजे सोमवारपासून विधानसभेचे सत्र सुरू होणार आहे. म्हणूनच यापूर्वी ही अफवा पसरविली जात आहे.” ते म्हणाले की, महाराष्ट्राचे राजकारण हे भारत आणि पाकिस्तानसारखे नाही. राजकीय मतभेद असूनही सौहार्दपूर्ण संबंध आहेत.

यानंतर थोड्याच वेळात संजय राऊत यांनी ट्वीट केले की, ‘हमारी अफवाह के धुंए वहीं से उठते हैं, जहां हमारे नाम से आग लग जाती है!’

दरम्यान, आशिष शेलार यांनी संजय राऊत यांच्याशी अशा प्रकारची कोणतीही भेट झाल्याचे नाकारले होते, परंतु विधानसभेतील त्यांच्या पक्षाचे नेते प्रवीण दरेकर यांनी या भेटीला एक शिष्टाचार संबोधून एकप्रकारे दुजोरा दिला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकांपासूनच भाजप शिवसेनेचे संबंध बिघडलेले आहेत. विशेषत: संजय राठोड प्रकरण, अँटिलिया स्फोटके प्रकरण, वाझे प्रकरण, परमबीर सिंग प्रकरण यामुळे भाजपने सत्ताधाऱ्यांवर टीकेची एकही संधी दवडलेली नाही.

Sanjay Raut Denies meeting With Ashish Shelar Says Maharashtra politics is not like India-Pakistan relation

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण