फिलिपाइन्समध्ये मोठी विमान दुर्घटना, ९२ जणांना घेऊन जाणारे लष्कराचे विमान कोसळले, १७ जण ठार

A Philippine Military Plane Carrying 92 People Crashed 17 dead rescue op underway

Philippine Military Plane : फिलिपाइन्स एअर फोर्सचे सी-130 हे विमान दुर्घटनाग्रस्त झाले आहे. फिलिपाइन्स सशस्त्र सेना प्रमुख सिरिलेटो सोबेजाना यांनी सांगितले की, रविवारी दक्षिणी फिलिपाइन्समध्ये एक लष्करी विमान कोसळले. या विमानात किमान 92 जण उपस्थित होते, त्यापैकी 17 जणांचा मृत्यू झाला आहे. दुर्घटनेनंतर पेटलेल्या या विमानातून आतापर्यंत 40 जणांची सुटका करण्यात आली आहे. A Philippine Military Plane Carrying 92 People Crashed 17 dead rescue op underway


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : फिलिपाइन्स एअर फोर्सचे सी-130 हे विमान दुर्घटनाग्रस्त झाले आहे. फिलिपाइन्स सशस्त्र सेना प्रमुख सिरिलेटो सोबेजाना यांनी सांगितले की, रविवारी दक्षिणी फिलिपाइन्समध्ये एक लष्करी विमान कोसळले. या विमानात किमान 92 जण उपस्थित होते, त्यापैकी 17 जणांचा मृत्यू झाला आहे. दुर्घटनेनंतर पेटलेल्या या विमानातून आतापर्यंत 40 जणांची सुटका करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिलिपाइन्स एअर फोर्स (पीएएफ) चे सी -130 विमान रविवारी सकाळी पाटकुल सुलुजवळ क्रॅश झाले. सुलु प्रांतातील जिलस बेटावर जेव्हा विमान उतरण्याचा प्रयत्न सुरू होता तेव्हा विमानात आग लागल्याची माहिती आहे. सोबेजाना यांनी पत्रकारांना सांगितले की, हे अत्यंत दुर्दैवी आहे. विमान धावपट्टीवर उतरले नाही. वैमानिकाने पुन्हा त्याला नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो तसे करू शकला नाही आणि विमान कोसळले.

विमान कोसळताच तेथे पोहोचलेल्या अधिकाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. आतापर्यंत विमानातील 45 जणांची सुटका करण्यात आली आहे. मात्र, ही आग कशी लागली आणि हा अपघात कसा झाला हे अद्याप समजू शकलेले नाही. सध्या विमानात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.

A Philippine Military Plane Carrying 92 People Crashed 17 dead rescue op underway

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात