Bengal Election Result Live Mamata Banerjee Won Nadigram Seat by Deafiting Suvendu Adhikari By 1200 Votes

Bengal Election Result Live : नंदिग्राममध्ये दिग्गज ममतांनाही फुटला होता घाम, अवघ्या १२०० मतांनी झाला सुवेंदू अधिकारींचा पराभव

Bengal Election Result Live : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालात अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या नंदिग्राम मतदारसंघाचा निकाल लागला आहे. येथे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपच्या शुभेंदु अधिकारी यांचा अवघ्या 1200 मतांनी पराभव केला. सकाळी मतमोजणी सुरू झाल्यापासूनच दोन्ही उमेदवारांमध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळाली. एका फेरीत ममता पुढे तर दुसऱ्या फेरीत शुभेंदू अधिकारी आघाडीवर असायचे. सरतेशेवटी निवडणूक आयोगाने ममतांना 1200 ममतांनी विजयी घोषित केले आहे. Bengal Election Result Live Mamata Banerjee Won Nadigram Seat by Deafiting Suvendu Adhikari By 1200 Votes


विशेष प्रतिनिधी

नंदिग्राम : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालात अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या नंदिग्राम मतदारसंघाचा निकाल लागला आहे. येथे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपच्या शुभेंदु अधिकारी यांचा अवघ्या 1200 मतांनी पराभव केला. सकाळी मतमोजणी सुरू झाल्यापासूनच दोन्ही उमेदवारांमध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळाली. एका फेरीत ममता पुढे तर दुसऱ्या फेरीत शुभेंदू अधिकारी आघाडीवर असायचे. मतमोजणी पूर्ण झाल्यावर निवडणूक आयोगाने ममतांना 1200 ममतांनी विजयी घोषित केले आहे.

पश्चिम बंगालच्या इतर मतदारसंघांची मतमोजणी अद्यापही सुरूच आहे. या निवडणुकीत बंगालची सर्वात चर्चित आणि हाय-प्रोफाइल सीट नंदीग्राम राहिली. येथील मतांची मोजणी नुकतीच पूर्ण झाली आहे. नंदिग्राममध्ये मुख्यमंत्री आणि तृणमूल सुप्रीमो ममता बनर्जी यांना त्यांचे कधीकाळचे सहकारी व आता भाजप उमेदवार शुभेंदु अधिकारींनी कडवे आव्हान दिल्याचे पाहायला मिळाले.

सुरुवातीच्या अनेक फेऱ्यांमध्ये पिछाडीवर राहिलेल्या ममतांना अखेरच्या काही टप्प्यांत आघाडी मिळवण्यात यश आले. दोन्ही उमेदवारांमध्ये टफ फाइट पाहायला मिळाली. कधी ममता पुढे राहत होत्या, तर कधी शुभेंदु अधिकारी आघाडीवर राहत होते. अखेरीस विजय ममतांचा झाला, तोही निसटताच म्हणावा लागेल. त्यांनी अखेरच्या फेरीतील मतमोजणीनंतर 1200 मतांनी विजयाची नोंद केली.

Bengal Election Result Live Mamata Banerjee Won Nadigram Seat by Deafiting Suvendu Adhikari By 1200 Votes

हेही वाचा…