Belgaum Bypoll Result Live: बेळगावात पुन्हा कमळ फुललं ; भाजपच्या मंगला अंगडी यांचा विजय ;काँग्रेसच्या सतीश जारकीहोळी यांचा ५२४० मतांनी पराभव


  • खासदार सुरेश अंगडी यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेसाठी १७ एप्रिलला मतदान झाले होते. १८ लाख १३ हजार ५६७ पैकी १० लाख ८ हजार ६०१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

विशेष प्रतिनिधी

बेळगाव : बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकी साठी झालेल्या मतदानाची आज मतमोजणी झाली असून निकाल  समोर आला आहे. ही निवडणूक खूपच अटीतटीची झाली . या निवडणुकीत भाजपच्या मंगला अंगडी यांनी  ५२४० मतांनी विजय मिळवला आहे.Belgaum Bypoll Result Live  mangala angadi achived victory

कुणाला किती मते?

बेळगाव पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवार मंगला अंगडी यांना सर्वाधिक जागा मिळाल्या. मंगला यांना ४४०३२७ मते मिळाली. तर या निवडणुकीत काँग्रेस हा दुसरा पक्ष ठरला आहे. काँग्रेसचे उमेदवार सतीश जारकीहोळी यांना ४३५०८७ मते मिळाले आहेत. तर महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांना ११७१७४ मते मिळाली.

बेळगाव लोकसभा मतदारसंघात एकूण ८ विधानसभा मतदारसंघ येतात. ज्यामध्ये बेळगाव उत्तर, बेळगाव दक्षिण, बेळगाव ग्रामीण, गोकाक, रामदुर्ग, अऱभावी, सौदत्ती यल्लमा या विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे.

Belgaum Bypoll Result Live :  BJP Mangala Angadi achived victory 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात