West bengal assembly elections 2021 results updates : बंगालमध्ये ममतांचा निवडणूकीपूर्वी मंदिर दर्शन, चंडीपाठ; तृणमूळ विजयानंतर हिरव्या गुलालाची उधळण!!

विशेष प्रतिनिधी

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूळ काँग्रेसची विजयाकडे घोडदौड सुरू असताना पक्षाचे कार्यकर्ते हिरवा गुलाल उधळून विजयोत्सव साजरा करताना दिसत आहेत.West bengal assembly elections 2021 results updates; mamata banerjee`s chandi paath to green gulal, TMC changes colours

निवडणूक आयोगाच्या अधिकृत आकडेवारीनुसार तृणमूळ काँग्रेस २०२ जागांवर आघाडीवर गेली असताना तृणमूळ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कोलकाता, कालीघाट येथे तसेच ममता बॅनर्जींची आधीची सीट भवानीपूरमध्ये हिरवा गुलाल उधळून विजयोत्सव केलेला दिसला.भवानीपूरमध्ये तृणमूळ काँग्रेसचे उमेदवार सोहनदेव चट्टोपाध्याय यांनी आघाडी घेतली आहे. आसनसोलमध्येही तृणमूळच्या कार्यकर्ते हिरवा गुलाल उधळून विजयोत्सव साजरा करताना दिसत आहेत.

निवडणूक प्रचारादरम्यान ममता बॅनर्जींवर भाजपने मुस्लीम तुष्टीकरणाचा आरोप केला होता. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी ममतांनी मंदिरांना भेटी देणे, दर्शन घेणे, जाहीर सभांमध्ये चंडीपाठ म्हणणे सुरू केले होते.

आता ज्या वेळी तृणमूळ काँग्रेसला विजय मिळताना दिसत आहे, त्यावेळी मात्र कार्यकर्ते हिरवा गुलाल उधळताना दिसत आहेत.

West bengal assembly elections 2021 results updates; mamata banerjee`s chandi paath to green gulal, TMC changes colours