पंढरपूरमध्ये पडले तोंडावर; कोलकात्यात केले “नाक वर”; ममतांच्या विजयाबद्दल अभिनंदनाचे पवारांचे ट्विट


विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रात ठाकरे – पवार सरकारच्या महाविकास आघाडीने प्रतिष्ठेच्या केलेल्या पंढरपूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या पराभवाने महाविकास आघाडी तोंडावर पडली आहे…sharad pawar congrasulates mamata banerjee for west bengal victory

तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी आपल्या पडेल उमेदवाराबद्दल ट्विट न करता बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी विजय मिळविला, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून विरोधकांचे “नाक वर” असल्याचे दाखवून दिले आहे.



शरद पवारांनी ममतांचे अभिनंदन करणारे ट्विट करताना यापुढे एकत्र येऊन जनतेसाठी काम करण्याचे त्यांना आवाहन केले आहे. यावर मराठी चॅनेलनी चर्चेचे पेव उघडून त्या ट्विटमधला राजकीय अर्थ शोधण्याचा प्रयत्न चालविला आहे.

शरद पवार हे २०२४ पूर्वी प्रादेशिक पक्षांची मोट बांधून तिसऱ्या आघाडीची रचना करणार असल्याचा जावईशोध मराठी चॅनेली पत्रकारांनी लावला आहे. त्यात त्यांनी परस्पर त्या आघाडीचे नेतृत्व ऐतिहासिक विजय मिळविणाऱ्या ममता बॅनर्जी यांना मराठी पत्रकारांनी देऊनही टाकले आहे.

पण पंढरपूरमध्ये महाविकास आघाडीने एकत्र येऊन दिलेल्या उमेदवाराचा दणकून पराभव झाल्याबद्दल जपून जपून बोलायला सुरूवात केली आहे किंवा त्यावर बोलायचे टाळत तरी आहेत.

उलट ममता बॅनर्जी यांच्या विजयाबद्दल राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे कार्यकर्ते तावातावाने सोशल मीडियावरील चर्चेत व्यक्त होताना दिसत आहेत. शरद पवारांच्या ट्विटनंतर तर त्यांचा जोर वाढला आहे. ममतांचा विजय जणू आपलाच आहे, अशा थाटात ते सोशल मीडियावर प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत.

तिकडे पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूळ काँग्रेसची विजयाकडे घोडदौड सुरू असताना पक्षाचे कार्यकर्ते हिरवा गुलाल उधळून विजयोत्सव साजरा करताना दिसत आहेत.

निवडणूक आयोगाच्या अधिकृत आकडेवारीनुसार तृणमूळ काँग्रेस २०२ जागांवर आघाडीवर गेली असताना तृणमूळ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कोलकाता, कालीघाट येथे तसेच ममता बॅनर्जींची आधीची सीट भवानीपूरमध्ये हिरवा गुलाल उधळून विजयोत्सव केलेला दिसला.

भवानीपूरमध्ये तृणमूळ काँग्रेसचे उमेदवार सोहनदेव चट्टोपाध्याय यांनी आघाडी घेतली आहे. आसनसोलमध्येही तृणमूळच्या कार्यकर्ते हिरवा गुलाल उधळून विजयोत्सव साजरा करताना दिसत आहेत.

निवडणूक प्रचारादरम्यान ममता बॅनर्जींवर भाजपने मुस्लीम तुष्टीकरणाचा आरोप केला होता. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी ममतांनी मंदिरांना भेटी देणे, दर्शन घेणे, जाहीर सभांमध्ये चंडीपाठ म्हणणे सुरू केले होते. आता ज्या वेळी तृणमूळ काँग्रेसला विजय मिळताना दिसत आहे, त्यावेळी मात्र कार्यकर्ते हिरवा गुलाल उधळताना दिसत आहेत.

sharad pawar congrasulates mamata banerjee for west bengal victory

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात