भोपाळमध्ये ६ संशयित दहशतवाद्यांना अटक, मोठ्या प्रमाणात स्फोटकं आणि हत्यारे जप्त


वृत्तसंस्था

भोपाळ : मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये गुप्तचर यंत्रणेने दशतवाद्यांचे मोठे रॅकेट उध्वस्त केले आहे. भोपाळमध्ये फातिमा मशीदीजवळील एका इमारतीत काही संशयित दहशतवादी राहत होते. पोलिसांनी छापा घालून सर्व दहशतवाद्यांना अटक केली आहे.6 suspected terrorists arrested in Bhopal

पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास ५०-६० पोलीस इमारतीत घुसले आणि आरोपींच्या घराचे दार तोडून आत शिरले. दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात हत्यारे आणि स्फोटकं जप्त करण्यात आली आहे. तसेच इमारतीत मोठ्या प्रमाणात धार्मिक साहित्य, डझनवारी लॅपटॉपही आढळले आहेत.



या ऑपरेशनसह भोपाळच्या करौंड भागात आणखी एक छापा घालण्यात आला आहे. या भागतही काही संशयित आरोपींना अटक केली आहे. सर्व आरोपींना अटक झाली असून त्यांची चौकशी सुरू आहे.

सर्व आरोपी २५-३० वयोगटातील असून तीन आरोपी बांग्लादेशचे आहेत. हे दहशतवादी तालिबानी विचारसरणीचे असून भारतात मोठा दहशतवादी कट आखण्याच्या तयारीत होते.

6 suspected terrorists arrested in Bhopal

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात