महाराष्ट्रातील वाघाची कॉँग्रेस- राष्ट्रवादीसोबत गेल्याने शेळी, भोपाळमध्ये मात्र व्हॅलेंटाईन डे विरोधात डरकाळ्या


विशेष प्रतिनिधी

भोपाळ :व्हॅलेंटाईन डे हे म्हणजे नखरे आहेत. असली थेरं आम्ही महाराष्ट्रात चालू देणार नाही. दिसेल तिथे युगुलांना ठोकून काढू, असे इशारे देणाऱ्या शिवसेनेचा महाराष्ट्रात व्हॅलेंटाईन डेला असणारा विरोध पूर्ण बंद झाला आहे. मात्र, भोपाळमध्ये शिवसेनेच्या व्हॅेंटाईन डे विरोधत डरकाळ्या सुरू आहेत.Maharashtra’s Tiger Goat with NCP, but in Bhopal, there are hints against Valentine’s Day

‘व्हॅलेंटाइन डे’ आढळून येणाºया प्रेमी युगुलांना धडा शिकवण्यासाठी भोपाळमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांनी तयारी केली आहे. लाठ्यांची पूजा केली आहे. बगिचात किंवा पार्कमध्ये काही करताना दिसले बेबी, बाबू आणि सोना… तर तोडू शरीराचा एक एको कोना… असा इशारा शिवसेनेने दिला आहे.



सन 1995च्या काळात शिवसेनेचे सरकार होते, तेव्हा व्हॅलेंटाईन डेला असणारा विरोध आणखीच वाढला. शिवसेनेच्या आक्रमक पवित्र्यामुळे कोणी व्हॅलेंटाईन डे साजरा करायला धजावत नसायचे. मात्र, आता शिवसेनेचा वाघ मवाळ झालाय.

भोपाळमध्ये मात्र ‘व्हॅलेंटाइन डे’ आढळून येणाऱ्या प्रेमी युगुलांना धडा शिकवण्यासाठी भोपाळमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांनी तयारी केली आहे. शिवसेना कार्यकर्त्यांनी भोपाळच्या कालिका शक्ती पीठ मंदिरात पूजा केली. यासोबतच ‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा करणाऱ्या तरुणांना इशाराही दिला.

‘व्हॅलेंटाइन डे’ हा पाश्चात्य संस्कृतीचे प्रतीक आहे. यामुळे ‘व्हॅलेंटाइन डे’ला विरोध होणार. लाठ्या-काठ्यांसह कार्यकर्ते शहराच्या वेगवेगळ्या भागात फिरतील. ‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा करताना प्रेमी युगुल दिसले, तरुणी-तरुणी आढळून आले तर त्यांचे तिथे लग्न लावले जाईल आणि ढोल-ताशासह वरात काढली जाईल, असा इशारा शिवसेनेने दिला आहे.

Maharashtra’s Tiger Goat with NCP, but in Bhopal, there are hints against Valentine’s Day

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात