आसामच्या मुख्यमंत्र्यांना म्हणून आहे राहूल गांधींचा राग, कुत्र्याच्या प्लेटमधील बिस्किटे दिली होती खायला


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : एकेकाळी कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेले आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा राहूल गांधी यांच्यावर सातत्याने हल्लाबोल करत आहेत. त्यांना राहूल गांधी यांचा इतका राग का आहे, याचेही कारण आहे. राहूल गांधींची भेट घेण्यासाठी गेले असताना सरमा यांच्यासह कॉँग्रेस नेत्यांना कुत्र्याच्या प्लेटमधील बिस्किटे खाण्यास दिली होती.Thats why Aasam CM is angry with Rahul Gandhi

सरमा यांनी ट्विटर हँडलवर लिहिले होते की, श्री. राहुल गांधी, आसाममधील नेत्यांच्या उपस्थितीत कुत्र्यांना बिस्किटे खायला प्राधान्य देणारे आणि नंतर तीच बिस्किटे त्यांना देऊ करणारे हे राजकीय सभ्यतेबद्दल बोलणारे शेवटचे लोक असावेत. हायकमांडची मानसिकता ही कॉँग्रेसची सर्वाथार्ने आणि शेवटची आहे. हे भारतातील लोकांना चांगलेच माहीत आहे.ह्व



सरमा यांनी सांगितले होते की, जेव्हा ते आणि काही आसाम नेते राहुल गांधींना भेटायला घरच्या घरी गेले तेव्हा ते त्यांच्या कुत्र्याला पिऊ खाऊ घालण्यात व्यस्त होते. त्यांना हे नेते काय बोलत आहेत याबाबत काहीही निर्णय नव्हता. त्या बैठकीत आसामच्या नेत्यांना चहा आणि बिस्किटे देण्यात आली आणि राहुल गांधींच्या कुत्र्याने जाऊन प्लेटमधून एक बिस्किट उचलले.काही मिनिटांनंतर, तिथे उपस्थित असलेले सर्व नेत त्याच प्लेटमधून बिस्किटे घेऊ लागले.

सरमा हे काँग्रेसचे दिग्गज नेते होते. वकील, स्वत:च्या टीव्ही चॅनलमुळे राज्यात ओळख आणि तडफदार नेता अशी त्यांची ओळख. २००६ मध्ये सरमा यांनी काँग्रेसच्या विजयाचा मार्ग आखला आणि ते तत्कालीन काँग्रेस मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचे खास बनले. पण संपूर्ण राज्यात झंझावाती प्रचार करणाऱ्या या नेत्याला बाजूला सारत जेव्हा गोगोई यांनी आपल्या मुलाला पुढे आणलं तेव्हा सरमा यांना ते सहन झालं नाही.

अखेर त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आणि ते भाजपात दाखल झाले. भाजपात आल्यानंतर सरमा यांनी फक्त आसामच नव्हे, तर भाजपची अरुणाचल प्रदेश, मणिपूर, त्रिपुरा, नागालँड आणि मेघालय या राज्यातही सत्ता आणली. ईशान्येतील नेहमीच दुर्लक्षित असलेल्या नेत्यांना भाजपच्या हायकमांडपर्यंत नेलं आणि समन्वय साधला. त्यामुळेच गेल्या निवडणुकीनंतर सबार्नंद सोनोवाल यांना दुसरी संधी न देता भाजपने सरमा यांना मुख्यमंत्रीपदी संधी दिली.

आपले कॉँग्रेस सोडण्याचे कारण राहूल गांधी असल्याचे सरमा नेहमीच सांगतात. गोगोई म्हणतील ते ऐकायचं अशी सूचना त्यांना मिळाली होती, जी त्यांनी मान्य केली नाही. राहुल गांधी आणि सरमा यांच्यात काय झालं त्याचा किस्सा ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी आपल्या पुस्तकात लिहिली आहे. लोकसभेतील पराभवानंतर सरमा यांनी राज्याच्या नेतृत्व आपल्याकडे देण्याची मागणी केली.

काँग्रेसला पुढच्या (२०१६) निवडणुकीत विजय मिळवायचा असेल तर नेतृत्त्व बदल आवश्यक आहे, असे त्यांनी सोनिया गांधी यांना सांगितले. यावेळी सोनिया गांधींचे राजकीय सचिव अहमद पटेलही उपस्थित होते. यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांना आसाममध्ये पाठवण्यात आलं. त्यांच्या अहवालानुसार, ७८ पैकी ५२ आमदारांचा सरमा यांना पाठिंबा होता.

काही काळानंतर सरमा यांना मुख्यमंत्री बनवलं जाईल असा शब्द सोनिया गांधी आणि अहमद पटेल यांच्याकडून देण्यात आल. पण उन्हाळ्यातील सुट्टी साजरी करुन आल्यानंतर राहुल गांधींनी काँग्रेसच्या वरिष्ठांनी सरमा यांच्यासाठी जो निर्णय घेतला होता, त्यावर आक्षेप घेतला. यानंतर बिसवा सरमा यांनी गोगोई मंत्रीमंडळातून राजीनामा दिला.

Thats why Aasam CM is angry with Rahul Gandhi

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात