भारताचा उदय होत असलेल पाहून अपचनचात्रास , उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांची पाश्चात्य माध्यमांवर टीका


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारत हा जगातील सर्वाधिक धर्मनिरपेक्ष देश आहे, असे असूनही, पाश्चिमात्य माध्यमे धर्मनिरपेक्षता आणि भाषण स्वातंत्र्याच्या मुद्दय़ांवर भारत सरकारला कमी लेखतात, भारताचा होत असलेला उदय काही जणांच्या पचनी पडत नाही, त्यांना अपचनाचा त्रास होतो,Vice President Venkaiah Naidu Criticizes Western Media

अशी टीका करत उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी भारतीय लोकशाहीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना फटकारले आहे.नेहरू स्मारक संग्रहालय आणि ग्रंथालयाच्या कार्यकारी परिषदेचे उपाध्यक्ष ए सूर्यप्रकाश यांच्या डेमोक्रेसी, पॉलिटिक्स अँड गव्हर्नन्स या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी नायडू बोलत होते.



ते म्हणाले, भारतीय संविधान सवार्चे हित लक्षात घेऊन नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करते. जात, धर्म, वर्ग, रंग, प्रदेश याची पर्वा न करता भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला देशहितासाठी काम करण्याची संधी दिली आहे. धर्मनिरपेक्षता भारतीयांच्या रक्तातच नव्हे तर नसानसांमध्ये भिनलेली आहे.

त्यासाठी परकीय शक्तींच्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही.पाश्चिमात्य माध्यमे भारताचे चुकीचे चित्रण करत आहेत. त्यांना भारताची प्रगती देखवत नाही. मात्र, प्रभावी पुराव्याच्या आधारे सूर्यप्रकाश यांनी सत्य समोर आणले आहे, असे नायडू म्हणाले.

Vice President Venkaiah Naidu Criticizes Western Media

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात