कोरोनाचा नवीन विषाणू लसीला दाद देत नसल्याचे स्पष्ट, सार जग पुन्हा धास्तावले


विशेष प्रतिनिधी

जोहान्सबर्ग – दक्षिण आफ्रिका आणि बोट्स्वाना आढळलेल्या कोरोनाच्या नवीन व्हेरियंटमुळे धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. दक्षिण आफ्रिकेतील नवीन विषाणू लसीला देखील दाद देत नसल्याचे आढळून आले आहे.New corona variant spredding fastly in Afirican Nations

नव्या विषाणूंची तीव्रता पाहता ब्रिटनने आफ्रिकेतील सहा देशांतील उड्डाणे स्थगित केले आहेत. दक्षिण आफ्रिका, नामीबिया, बोट्स्वाना, झिम्बाब्वे, लिसोथो आणि एसवाटिनी या देशांचा समावेश आहे. भारतातही सजगता बाळगली जात असून हॉंगकॉंग आणि बोट्स्वाना येथून येणाऱ्या प्रवाशांची चाचणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.



दक्षिण आफ्रिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंफेक्शियस डिसीजने म्हटले की, देशात आतापर्यंत २२ रुग्ण आढळले आहेत. यास बी.१.१.५२९ असे नाव दिले आहे. आफ्रिकेत या विषाणूचे ५० हून अधिक प्रकार आढळले आहेत. बोट्स्वाना येथे ३२ प्रकार आढळल्याने चिंतेत भर पडली आहे. दक्षिण आफ्रिकेत गेल्या चोवीस तासात २४६५ रुग्ण आढळून आले असून ११४ जणांचा मृत्यू झाला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने डॉ. मारिया वान यांनी म्हटले की, या विषाणूबाबत फारशी माहिती नाही. विषाणूंचा स्वभाव सतत बदलणारा असल्यामुळे आरोग्य विभागासाठी चिंतेची बाब आहे. त्यामुळे या धोकादायक विषाणूंमुळे ब्रिटनने सहा आफ्रिकी देशातील उड्डाणे तूर्त स्थगित केली आहे. ब्रिटनचे आरोग्य विभागाचे सचिव साजिद जावेद यांनी म्हटले की, आरोग्य यंत्रणा नवीन विषाणूंवर संशोधन करत आहेत.

New corona variant spredding fastly in Afirican Nations

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात