विशेष प्रतिनिधी
बर्लिन – जर्मनीने दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या नागरिकांवर ट्रॅव्हल बॅन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा नियम आज रात्रीपासूनच लागू झाला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या लगत असणाऱ्या देशांना देखील बंदी लागू शकते. लसीकरण झाल्यानंतरही जर्मनीच्या नागरिकांना देशात पोचल्यानंतर चौदा दिवस क्वारंटाइन राहावे लागणार आहे.Isryal declaers emergency due to corona
मलावी येथून आलेल्या एका प्रवाशांत कोरोनाचा नवीन विषाणू आढळल्याची माहिती आज इस्राईलच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले. देशात पुन्हा आणीबाणी लागू करण्यात आली आहे. प्रवासी आणि अन्य दोन संशयितांना आयसोलेशनमध्ये ठेवल्याचे सांगितले.
तिघांचेही लसीकरण पूर्ण झाले असून त्यांच्या लसीची नेमकी स्थिती तपासली जात असल्याचे नमूद केले आहे. कोरोनाचा नवीन विषाणू दक्षिण आफ्रिकेत आढळला असून तो गुटेंग प्रांतात वेगाने पसरत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more