युवतीकडून अश्लिल व्हिडीओद्वारे ब्लॅकमेल झाल्यानेच भय्यू महाराजांची आत्महत्या, व्हॉटसअ‍ॅप चॅटमधून स्पष्ट


विशेष प्रतिनिधी

इंदूर : एका युवतीकडून ब्लॅकमेल होत असल्यानेच भय्यू महाराज यांनी आत्महत्या केल्याचे व्हॉटसअ‍ॅप चॅटमधून उघड झाली आहे. भोपाळच्या फॉरेन्सिक अधिकाºयांनी 109 पानांचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट रिकव्हर करून न्यायालयात सादर केले आहे. यामध्ये भय्यू महाराजांना ब्लॅकमेल करणारी पलक एका पीयूष जीजू नावाच्या व्यक्तीसोबत चॅटिंग करत होती. या चॅटिंगमध्ये भय्यू महाराज यांची आत्महत्या एक षडयंत्र होता असे स्पष्ट होत आहे.Bhayyu Maharaj commits suicide after being blackmailed by a young woman through pornographic video, clear from WhatsApp chat

पलक हिने भय्यू महाराजांचे काही अश्लील व्हिडिओ बनवले होते. एकीकडे याच व्हिडिओंच्या माध्यमातून ब्लॅकमेल करत होती. तर दुसरीकडे, भय्यू महाराजांनी आयुषीसोबत 17 एप्रिल 2017 रोजी दुसरा विवाह केला होता. पलक भय्यू महाराजांना वर्षभरात लग्न करण्यासाठी दबाव टाकत होती. पलक आणि भय्यू महाराज दोन वर्षे संपर्कात होते. तिलाच महाराजांसोबत विवाह करायचा होता. परंतु, त्यांनी डॉ. आयुषीला आपली दुसरी पत्नी बनवले. लग्नाच्या दिवशी पलकने गोंधळ घातला होता.चॅटिंगमध्ये कोड वर्ड सुद्धा वापरण्यात आले आहे. इट याचा अर्थ भय्यू महाराज असा घेतला जाऊ शकतो. इट ला वेडसर करून घरात बसवण्याचे प्रयत्न करण्यात आले. सोबतच, एका तांत्रिकासोबत यासाठी 25 लाख रुपयांची डील झाली होती असेही चॅटिंगमध्ये दिसून येते. भय्यू महाराज यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी पलक हिला आधीच अटक केली आहे.

इंदूरचे अपर सत्र न्यायाधीश धर्मेश सोने यांच्यासमोर हा खटला सुरू आहे. पोलिसांनी आरोपींचे मोबाईल जप्त करून डिलीट केलेल्या चॅटिंगचा डेटा रिकव्हर केला आहे. या प्रकरणात शुक्रवारी झालेल्या सुनावणीत आरोपी पलकचे वकील धर्मेंद्र गुर्जर, आशीष चौरे यांनी उलट तपासणी सुद्धा केली. सोबतच, या चॅटिंगची माहिती घेतली. आरोपींच्या चॅटिंगमधून पोलिसांना महत्वाचे खुलासे केले आहेत.

पलकच्या चॅटिंगचा काही भाग
पलक: भैय्या, आयुषीला चांगलाच तांत्रिक सापडला आहे. 25 लाखांत डील झाली आहे.
पीयूष जीजू: कुणासोबत?
पलक: तांत्रिकासोबत…
पलक: इट ला पागल करून घरी बसवले आहे.
पीयूष जीजू: कुहू घरी येणार आहे. उद्या कुहूची रूम ठीक होईल.
पलक: कुहूने शरदला सांगितले आहे की मी समोर आले की ती मला मारून टाकणार आहे.
पलक: यावेळी तर कुहू पूर्ण तयारीनेच आलेली दिसते.
पीयूष जीजू: कुठे? इंदूर
पलक: आयुषीने येऊन पुन्हा काम बिघडवले.
पलक: आयुषीने पुन्हा वहिणी, कुहू आणि बापूंचे फोटो जाळून टाकले.

अध्यात्मिक गरुू असलेल्या भय्यू महाराज यांनी 12 जून 2018 रोजी राहत्या घरात स्वत:ला गोळी झाडून आत्महत्या केली. या प्रकरणात पोलिसांनी महाराजांचे 2 सेवक विनायक आणि शरद यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याच्या आरोपात अटक केली. शरद ड्रायव्हर होता तर विनायक त्यांचा जुना कर्मचारी होता.

विनायक हाच भय्यू महाराजांचा पूर्ण हिशेब पाहायचा. यासोबतच पलकला सुद्धा अटक करण्यात आली. ज्येष्ठ वकील अविनाश सिरपुरकर, धर्मेंद्र गुर्जर आणि आशीष चौरे या तिघांची बाजू मांडत आहेत.

Bhayyu Maharaj commits suicide after being blackmailed by a young woman through pornographic video, clear from WhatsApp chat

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात