जर्मनीत कोरोनाचा पुन्हा कहर : ख्रिसमसच्या तोंडावर मार्केट बंद, आरोग्यमंत्र्यांचे नागरिकांना लसीकरणाचे आवाहन

Corona crisis in Germany again Market closed Ahead Of Christmas, Health Minister appeals to citizens for vaccination

Corona crisis in Germany : जर्मनीच्या आरोग्यमंत्र्यांनी लोकांना इशारा दिला आहे की, कोरोना संसर्ग टाळण्यासाठी त्यांनी लसीकरण करून घ्यावे, अन्यथा हिवाळा संपेपर्यंत त्यांना एकतर संसर्ग होईल किंवा संसर्गामुळे त्यांचा मृत्यू होईल. अनेक युरोपीय देशांनी वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू केले आहेत. आरोग्यमंत्री जॅन्स स्पॅन म्हणाले, “कदाचित या हिवाळ्याच्या अखेरीस, जर्मनीतील प्रत्येकाला लसीकरण केले जाईल, एक तर ते बरे होतील किंवा ते मरतील.” आयसीयूमध्ये खाटा अपुऱ्या पडत आहेत आणि हे पाहता नवीन निर्बंध लागू केले जात आहेत. यामध्ये ख्रिसमस मार्केटही बंद करण्याचा समावेश आहे. Corona crisis in Germany again Market closed Ahead Of Christmas, Health Minister appeals to citizens for vaccination


वृत्तसंस्था

बर्लिन : जर्मनीच्या आरोग्यमंत्र्यांनी लोकांना इशारा दिला आहे की, कोरोना संसर्ग टाळण्यासाठी त्यांनी लसीकरण करून घ्यावे, अन्यथा हिवाळा संपेपर्यंत त्यांना एकतर संसर्ग होईल किंवा संसर्गामुळे त्यांचा मृत्यू होईल. अनेक युरोपीय देशांनी वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू केले आहेत. आरोग्यमंत्री जॅन्स स्पॅन म्हणाले, “कदाचित या हिवाळ्याच्या अखेरीस, जर्मनीतील प्रत्येकाला लसीकरण केले जाईल, एक तर ते बरे होतील किंवा ते मरतील.” आयसीयूमध्ये खाटा अपुऱ्या पडत आहेत आणि हे पाहता नवीन निर्बंध लागू केले जात आहेत. यामध्ये ख्रिसमस मार्केटही बंद करण्याचा समावेश आहे.

देशातील ज्या भागात रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण जास्त आहे, तेथे लसीकरणाशिवाय सिनेमा हॉल, जिम आणि इनडोअर डायनिंग यासारख्या सार्वजनिक ठिकाणी बंदी घालण्यात येणार आहे. जर्मनीच्या चांसलर अँजेला मर्केल यांनी इशारा दिलाय की जर्मनीच्या सध्याच्या कोविड निर्बंधांमध्ये काही सार्वजनिक ठिकाणी लसीकरण न केलेल्या लोकांना प्रतिबंधित करणे समाविष्ट आहे. हेही पुरेसे नाही. कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेत्यांशी बोलताना मर्केल म्हणाल्या, येथील परिस्थिती खूपच नाट्यमय आहे, कारण दर 12 दिवसांनी नवीन कोरोना संसर्गाची प्रकरणे दुप्पट होत आहेत. त्यामुळे आरोग्य अधिकारी चांगलेच चिंतेत आहेत.

सोमवारी जर्मनीमध्ये 30,643 नवीन रुग्णांची नोंद झाली. अशा प्रकारे, देशातील एकूण संक्रमित लोकांची संख्या 53 लाखांच्या पुढे गेली आहे. आरोग्यमंत्री म्हणाले, आतापर्यंत एक लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत 62 जणांचा मृत्यू झाला आहे. ते म्हणाले की, आमच्याकडे अनेक रुग्णालयांमध्ये अतिशय कठीण परिस्थिती आहे. दुसरीकडे, युरोपमध्ये कोरोनाची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे अनेक देशांमध्ये लॉकडाऊन लागू करावा लागला आहे. त्याचबरोबर लॉकडाऊनविरोधात लोकांचा निदर्शनेही पाहायला मिळत आहे.

Corona crisis in Germany again Market closed Ahead Of Christmas, Health Minister appeals to citizens for vaccination

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात