खासदार असदुद्दीन ओवेसी यांना सोलापूर वाहतूक पोलिसांनी केला २०० रुपयांचा दंड ; जाणून घ्या नेमक काय आहे कारण


सेंट्रल मोटार विकल रुल ५०/१७७ नुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. MP Asaduddin Owaisi fined Rs 200 by Solapur traffic police; Find out exactly what the cause is


विशेष प्रतिनिधी

सोलापूर : राज्यात येणाऱ्या महापालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार आहेत. पार्श्व भूमीवर ऑल इंडिया मजलिस- ए- इत्तेहादुल मुसलिमीन पार्टीची काही दिवसांपूर्वी औरंगाबादमध्ये बैठक झाली होती.एमआयएम पक्षाचे सर्वेसर्वा खासदार असदोद्दिन ओवेसी यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. याच पार्श्भूमीवर खासदार ओवेसी सोलापूरच्या दौऱ्यावर आले आहेत.



यावेळी असदुद्दीन ओवेसी यांना सोलापूर वाहतूक पोलिसांनी २०० रुपयांचा दंड केला. सेंट्रल मोटार विकल रुल ५०/१७७ नुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.ओवेसी यांची गाडी विनानंबर प्लेट होती. यामुळे पोलिसांकडून ओवेसींना दंड ठोठावण्यात आला आहे.शासकीय विश्रामगृहाबाहेर शहर वाहतूक पोलिसांनी ही कारवाई केली आहे.पक्षाचे शहराध्यक्ष फारुक शेख यांनी दोनशे रुपयांचा दंड भरला असल्याचं समोर येत आहे.

MP Asaduddin Owaisi fined Rs 200 by Solapur traffic police; Find out exactly what the cause is

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात