I have proof of connection of Nawab Malik and Dawood', Malik Shared chats, Now Sameer Wankhede wife Kranti Redkar clarified

‘माझ्याकडे नवाब मलिक आणि दाऊदच्या संबंधांचे पुरावे’, समीर वानखेडे यांच्या पत्नीच्या चॅट्स मलिकांकडून शेअर, क्रांती रेडकर यांनी दिले स्पष्टीकरण

Nawab Malik : एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे आणि राष्ट्रवादीचे नेते व मंत्री नवाब मलिक यांच्यात मोठा संघर्ष पाहायला मिळत आहे. आता नवाब मलिक यांनी क्रांती रेडकर यांच्या चॅट्सचे स्क्रीनशॉट्स शेअर केले आहेत. यात समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकर आणि कॅप्टन जॅक नावाच्या व्यक्तीमधील चॅटिंगचा समावेश आहे. यामध्ये जॅक नावाची व्यक्ती दावा करतेय की त्याच्याकडे नवाब मलिक आणि दाऊद इब्राहिम यांच्यात संबंध असल्याचे पुरावे आहेत. या चॅट्सवर नवाब मलिक यांनीही ‘ओह माय गॉड’ म्हणत आपली प्रतिक्रिया दिली आहे. यानंतर या चॅटवर क्रांती रेडकर यांचा खुलासाही आला आहे. I have proof of connection of Nawab Malik and Dawood’, Malik Shared chats, Now Sameer Wankhede wife Kranti Redkar clarified


प्रतिनिधी

मुंबई : एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे आणि राष्ट्रवादीचे नेते व मंत्री नवाब मलिक यांच्यात मोठा संघर्ष पाहायला मिळत आहे. आता नवाब मलिक यांनी क्रांती रेडकर यांच्या चॅट्सचे स्क्रीनशॉट्स शेअर केले आहेत. यात समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकर आणि कॅप्टन जॅक नावाच्या व्यक्तीमधील चॅटिंगचा समावेश आहे. यामध्ये जॅक नावाची व्यक्ती दावा करतेय की त्याच्याकडे नवाब मलिक आणि दाऊद इब्राहिम यांच्यात संबंध असल्याचे पुरावे आहेत. या चॅट्सवर नवाब मलिक यांनीही ‘ओह माय गॉड’ म्हणत आपली प्रतिक्रिया दिली आहे. यानंतर या चॅटवर क्रांती रेडकर यांचा खुलासाही आला आहे.

चॅटमध्ये कॅप्टन जॅक स्पॅरो नावाचा माणूस क्रांती रेडकर यांना दाऊद कनेक्शनचा पुरावा देण्याविषयी बोलतो. यावर क्रांती रेडकर यांचेही उत्तर आहे की, त्यांनी पुरावे दिले तर बदल्यात रिवॉर्ड मिळेल. त्यावर ती व्यक्ती राज बब्बर आणि नवाब मलिक यांचा फोटो क्रांती रेडकर यांना पाठवते. क्रांती रेडकरने विचारतात की, हे तर राज बब्बर आहेत, तर त्या व्यक्तीने उत्तर दिले की, राज बब्बर यांची पत्नीही त्यांना प्रेमाने दाऊद म्हणते. खुद्द नवाब मलिक यांनी या चॅटची माहिती ट्विट केली आहे. ट्विटमध्ये नवाब मलिक यांनी लिहिले की, ‘अरे देवा! काय गंमत आहे! मला आज सकाळीच मिळाले. आनंद घ्या!’

क्रांती रेडकर सायबर सेलमध्ये करणार तक्रार

नवाब मलिक यांनी स्वतः या चॅटचे ट्विट केले असून लोकांनाही या चॅटचा आनंद घेण्यास सांगितले आहे. मात्र, यावर आता क्रांती रेडकर यांचे उत्तर आले आहे. क्रांती रेडकर यांनी या चॅट फेक म्हटले आहे. जॅक नावाच्या व्यक्तीशी त्यांचे बोलणे झाले नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा याची शहानिशा न करता पोस्ट केली आहे. क्रांती रेडकर म्हणाल्या, ‘याप्रकरणी मी लवकरच मुंबई सायबर सेलकडे तक्रार करणार आहे. समर्थक काळजी करू नका, ही आमची भाषा आणि संस्कृती नाही.”

फेक चॅटचा कर्ता जॅक समोर आला, म्हणाला – गमतीसाठी मीम्स बनवले

दरम्यान, आता ती व्यक्तीही समोर आली आहे जिच्याशी क्रांती रेडकरने चॅट केल्याचा दावा केला जात आहे. कॅप्टन जॅक स्पॅरो या अकाउंट होल्डरने स्पष्ट केले आहे की, नवाब मलिक यांनी शेअर केलेल्या चॅटचा स्क्रीनशॉट हा व्यंग्यात्मक मीम्सचा भाग आहे आणि ती एक संपादित सामग्री आहे. त्या व्यक्तीच्या या स्पष्टीकरणाचा स्क्रीन शॉट शेअर करताना क्रांती रेडकर यांनी लिहिले की, ‘खूप दुःखद. हे प्रकरण एवढ्या पातळीवर येईल, असे वाटले नव्हते.”

हायकोर्टाने नवाब मलिकांना दिल्या होत्या कानपिचक्या

काल उच्च न्यायालयाने नवाब मलिक यांच्या बोलण्याच्या अधिकाराच्या बाजूने आदेश दिला. नवाब मलिक यांना त्यांच्या कुटुंबाची माहिती सोशल मीडियावर पोस्ट करण्यापासून रोखण्याची समीर वानखेडे यांच्या वडिलांची मागणी न्यायालयाने फेटाळून लावली. परंतु न्यायालयाने नवाब मलिक यांना कोणतीही माहिती पोस्ट करण्यापूर्वी त्याची पडताळणी करण्याचे निर्देश दिले. सोमवारी न्यायालयाच्या आदेशानंतर नवाब मलिक यांनी समीर वानखेडे कुटुंबावर हल्ला चढवत आज पुन्हा बनावट चॅट्स शेअर केल्या आहेत.

I have proof of connection of Nawab Malik and Dawood’, Malik Shared chats, Now Sameer Wankhede wife Kranti Redkar clarified

महत्त्वाच्या बातम्या