विशेष प्रतिनिधी
पाटणा : जस्टीस डिलेड इज जस्टीस डिनाईड (विलंबाने न्याय म्हणजे न्याय नाकारणे) असे म्हटले जाते. मात्र, बिहारमधील अररिय न्यायालयाने संपूर्ण देशापुढे आदर्श ठेवला आहे. केवळ एका दिवसात बलात्कार प्रकरणातील आरोपीची सुनावणी संपवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.Ideal for Bihar court, Bihar court renders life sentence to accused in rape case in one day
देशातील कोणत्याही न्यायालयाने दिलेला हा सर्वात जलद निकाल आहे. अररिया न्यायालयाने साक्षीदार, युक्तिवाद आणि प्रतिवाद नोंदवून, आरोपीला दोषी ठरवून आणि केवळ एका दिवसात निकाल जाहीर करून खटला पूर्ण केला. 4 ऑक्टोबर 2021 रोजी हे घडले असले तरी ऑर्डर उपलब्ध झाल्यानंतर शुक्रवारी ही बाब उघडकीस आली.
विशेष न्यायाधीश शशीकांत राय यांच्या न्यायालयाने दोषीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आणि 50,000 रुपये दंड ठोठावला. पीडित भरपाई निधीतून पीडितेला 7 लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
22 जुलै रोजी आठ वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाला होता. त्याबाबत २३ जुलै रोजी गुन्हा दाखल झाला होता. राय यांनी आपल्या 20 पानांच्या आदेशात म्हटले आहे: या प्रकरणातील साक्षीपुराव्यांची बारकाईने तपासणी केल्यावर, हे स्पष्ट होते की तपासी अधिकाऱ्यांनी चांगल्या पध्दतीने केला आहे. आरोपीने तपासात कोणताही दोष दाखवला नाही. बचाव पक्षाने घटनास्थळ आणि बलात्काराची घटना ज्या ठिकाणी घडली त्याबाबत वाद घातला नाही.
बिहार सरकारच्या गृह विभागाने म्हटले आहे की, कदाचित एका दिवसाच्या सुनावणीत शिक्षा सुनावण्यात आलेली ही पहिलीच घटना आहे. यापूर्वी मध्य प्रदेशातील दतिया जिल्ह्यात 8 ऑगस्ट 2018 रोजी न्यायालयाने तीन दिवसांच्या खटल्यानंतर निकाल दिला होता. बिहारने आता एका दिवसात खटला चालवून दोषीला जन्मठेपेची शिक्षा देऊन राष्ट्रीय विक्रम केला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more