फी म्हणून गायी स्वीकारणारे बिहारमधील कॉलेज थकित कर्जामुळे सील!; बँकेकडून कारवाई


वृत्तसंस्था

पाटणा : बिहारमधील एका इंजिनिअरिंग कॉलेजने फी म्हणून गायी स्वीकारण्याचे धोरण आखले. खर्चिक उच्च शिक्षण परवडत नाही, म्हणून गरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत असल्याने ही अनोखी शक्कल कॉलेजने लढविली. Colleges in Bihar accepting cows as fees sealed due to debts !; Action from the bank

दरम्यान, बँकेचे कर्ज न फेडल्यामुळे कॉलेजवर कारवाई केली. त्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारात जाणार आहे. बिहारच्या बक्सर जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे. अरियओन गावातील विद्यादान इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट अर्थात व्हीआयटीएम या संस्थेला बँकेनं टाळं लावलं आहे.

फी म्हणून गाय!

दरम्यान, या इंजिनिअरिंग कॉलेजची सर्वत्र चर्चा झाली ती अनोख्या अशा फी व्यवस्थेमुळे.बीटेकच्या पहिल्या वर्षासाठी दोन गायी आणि पुढच्या दोन वर्षांसाठी प्रत्येकी एक गाय देण्याची सवलत दिली होती. कॉलेजची वर्षाची फी ७२ हजार रुपये आहे. कॉलेजमध्ये ३०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.



कॉलेजकडून ५ कोटी ९ लाखांची कर्जवसुली प्रलंबित असल्यामुळे त्यावरून थेट कॉलेजच सील करण्याची कारवाई बँक ऑफ इंडियानं केली आहे. बँकेकडून २०१०मध्ये ४ कोटी ६५ लाखांचं कर्ज देण्यात आलं. त्यानंतर २०११मध्ये अजून १० कोटींचं पुरवणी कर्ज बँकेने मंजूर केले. पण हे कर्ज कधी संस्थेला प्राप्तच झालं नाही, अशी तक्रार संस्थेचे प्रमुख एस. के. सिंह यांनी केली.

दरम्यान, बँकेने हा दावा फेटाळला आहे. जेव्हा बँकेला वाटलं की हा प्रकल्प यशस्वी होताना दिसत नाही, तेव्हा अतिरिक्त मंजूर कर्जाची रक्कम देण्यात आली नाही, असं स्पष्टीकरण बक्सरमधील बँक ऑफ इंडियाच्या शाखेचे मॅनेजर रवीद्र प्रसाद यांनी दिले आहे.

Colleges in Bihar accepting cows as fees sealed due to debts !; Action from the bank

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात