वरुण गांधींचे भावनिक पत्र, म्हणाले ‘मी तुमचा होतो आणि राहणार…’


पिलीभीतशी असलेले नाते माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत संपणार नाही, असंही म्हणाले आहेत.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : मेनका गांधी आणि त्यांचा मुलगा वरुण गांधी यांच्यातील पिलीभीतमधील गेल्या 35 वर्षांपासून सुरू असलेले राजकीय संबंध बुधवारी संपुष्टात आले. 1989 नंतर पहिल्यांदाच दोघांनीही पिलीभीतमधून उमेदवारी दाखल केली नाही. भाजपने वरुण गांधी यांचे तिकीट रद्द करून यूपीचे कॅबिनेट मंत्री जितिन प्रसाद यांना उमेदवारी दिली आहे. वरुण गांधी यांनी पिलीभीतसोबतचे राजकीय संबंध तोडण्याबाबत भावनिक पत्र लिहिले आहे. त्यांनी लिहिले आहे की माझे आणि पीलीभीतमधील नाते हे प्रेम आणि विश्वासाचे आहे, जे राजकीय संबधापेक्षा खूप वरचे आहे.Varun Gandhis emotional letter to citizens of Pilbit says I was and will be yours



पिलीभीतच्या लोकांना अभिवादन करताना वरुण गांधी यांनी लिहिले की, ‘मी स्वत:ला भाग्यवान समजतो की मला पिलीभीतच्या महान लोकांची वर्षानुवर्षे सेवा करण्याची संधी मिळाली. पिलीभीतमध्ये आढळणारे आदर्श, साधेपणा आणि दयाळूपणाचा माझ्या संगोपनात आणि विकासात केवळ खासदार म्हणूनच नाही तर एक व्यक्ती म्हणूनही मोठा वाटा आहे. तुमचा प्रतिनिधी असणं हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान आहे आणि मी नेहमी तुमच्या हितासाठी माझ्या क्षमतेनुसार बोललो आहे.

बालपणीच्या आठवणी शेअर केल्या

आज हे पत्र लिहित असताना असंख्य आठवणींनी मला भावूक केले आहे. आपल्या बालपणीच्या आठवणी सांगताना त्यांनी लिहिले की, मला आठवते ते तीन वर्षांचा चिमुकला, जो 1983 मध्ये पहिल्यांदाच आपल्या आईचे बोट धरून पिलीभीतला आला होता, त्याला कसे माहित होते की एक दिवस ही भूमी त्याचे कामाचे ठिकाण बनेल आणि येथील लोक त्याचे कुटुंब बनतील.

त्यांनी पत्रात पुढे लिहिले आहे की, माझा खासदार म्हणून कार्यकाळ संपत असला तरी माझे पिलीभीतशी असलेले नाते माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत संपू शकत नाही. सर्वसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी मी राजकारणात आलो आणि आज कितीही किंमत मोजावी लागली तरी हे कार्य सदैव करत राहण्यासाठी मी तुमचा आशीर्वाद घेतो. त्यांनी पिलीभीतशी असलेले त्यांचे संबंध राजकीय संबंधापेक्षा कितीतरी वरचे असल्याचे वर्णन केले. शेवटी लिहिलं होतं- मी तुमचा होतो, आहे आणि राहणार.

Varun Gandhis emotional letter to citizens of Pilbit says I was and will be yours

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात