पवार काका – पुतणे जाहीर करेनात यादी, कारण त्यांच्यात एकमेकांमध्येच उमेदवारांची खेचाखेची!!


विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रात भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना, काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना या सगळ्या पक्षांनी अग्रक्रमाने आपापल्या लोकसभा उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या. पण राज्यामध्ये सर्वांत कमी जागा लढवणारे पवार काका – पुतणे मात्र अद्याप याद्या जाहीर करायला तयार नाहीत. कारण या दोघांचीही उमेदवार खेचाखेचीची तयारी चालू आहे. किंबहुना आपण यादी जाहीर केली, तर समोरचा पक्ष आपला बंडखोर पळवेल आणि त्याला तिकीट देऊन आपल्या विरोधात उभा करेल ही भीती पवार काका – पुतण्यांना वाटत आहे. Sharad pawar and ajit pawar don’t dare to announce their list for loksabha elections as they fear of rebellion

वास्तविक पवार काका – पुतणे आपापल्या आघाड्यांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहेत. शरद पवारांची प्रतिमा “राष्ट्रीय” नेते अशी असली, तरी प्रत्यक्षात त्यांची ताकद आता महाराष्ट्रातल्या साडेतीन जिल्ह्यांपुरतीसुद्धा शिल्लक नाही. ती ताकद अजित पवार आपल्या समवेत घेऊन बाहेर पडले आहेत. त्यामुळे खुद्द अजित पवारांची ताकद देखील साडेतीन जिल्ह्यांपलीकडे नाही. पण या साडेतीन जिल्ह्यांमध्येच पवार काका – पुतणे मिळून लोकसभेच्या फक्त 15 जागा लढवणार आहेत. त्यापैकी पवार काकांच्या वाट्याला महाविकास आघाडीतल्या फक्त 10 जागा, तर पुतणे पवारांना महायुतीतल्या फक्त 5 जागा वाट्याला आल्या आहेत. याचा अर्थ पवार नावाचा ब्रँड फक्त महाराष्ट्रातल्या 1/4 जागेवर चालतो. पण त्या 1/4 जागा देखील पवार काका पुतण्यांना झेपेनाश्या झाल्या आहेत. कारण त्यांना बंडखोर पळवण्याची भीती वाटत आहे.



शरद पवारांनी एखादा उमेदवार जाहीर केला, तर त्याच्या विरोधातला इच्छुक उमेदवार अजित पवारांकडे जाणार आणि तो शरद पवारांच्या उमेदवारा विरोधात उभा राहणार आणि अजित पवारांनी एखादा उमेदवार जाहीर केला, तर त्याच्या विरोधातला इच्छुक उमेदवार शरद पवारांकडे जाऊन तिकीट पटकावणार त्यामुळे “ताटातले वाटीत” आणि “वाटीतले ताटात” अशीच लढाई होणार ही भीती पगार काका – पुतण्यांना भेडसावत असल्यामुळे त्यांना आपापल्या याद्या लांबणीवर टाकाव्या लागत आहेत.

पण एकूण पवार नावाच्या ब्रँडला महाराष्ट्रातल्या 1/4 जागांवर खात्रीचे उमेदवार देता येत नाहीत. किंबहुना तेवढा त्यांच्यात आत्मविश्वास नाही ही खरी वस्तुस्थिती आहे. अन्यथा भाजपने 22, शिंदेंच्या शिवसेनेने 8, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने 17 आणि काँग्रेसने 12 उमेदवार जाहीर आघाडी घेतली आहे. त्यात सर्व पक्षांचा आत्मविश्वास दिसतो आहे, पण पवार काका – पुतण्यांमध्ये मात्र त्या आत्मविश्वासाचा पूर्ण अभाव आहे. म्हणूनच बाकीच्या पक्षांनी याद्या जाहीर करूनही पवार काका – पुतण्यांची मात्र आपल्या उमेदवार याद्या जाहीर करण्याची हिंमत होत नाही.

Sharad pawar and ajit pawar don’t dare to announce their list for loksabha elections as they fear of rebellion

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात