Judgesaheb : जज साहेब मला मोकळे करा म्हणत आरोपीने जजच्या दिशेने भिरकावली चप्पल

Judgesaheb

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Judgesaheb चार वर्षापासून जेलमध्ये बंदी असलेल्या आरोपीने कल्याण काेर्टात न्यायधीशाच्या दिशेने चप्पल भिरकावल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात महात्मा फुले पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. किरण भरम असे या आरोपीचे नाव आहे.Judgesaheb

कल्याण कोर्टात खडकपाडा पोलिस योगीधाम प्रकरणातील आरोपी अखिलेश शुक्ला, त्याची पत्नी गीता यांच्यासह चार आरोपीना कोर्टात हजर करणार होते. कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला होता. सर्व ठिकाणी पा्ेलिस होते. प्रसार माध्यमाचे प्रतिनिधी कोर्टात होती. यावेळी कोर्टात हालचाल सुरु झाली. काही वकिल बाहेर आले. त्यांनी पत्रकारांना काही माहिती दिली.



कल्याण न्यायालयाचे न्यायाधीश आर.जी. वाघमारे यांच्या कोर्टात एकअजबच प्रकार घडला. पोलिसांनी सांगितले की, किरण भरम हा आरोपी गेल्या चार वर्षापासून आधारवाडी जेलमध्ये आहे. खडकपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका हत्येच्या प्रकरणात त्याला अटक केली होती. तेव्हापासून तो जेलमध्ये आहे. त्याची आज सुनावणीची तारीख होती. तारखेची सुनावणी संपली होती. न्यायाधीशांनी पोलिसांना आरोपीस घेऊन जाण्यास सांगितले. त्याच वेळी आरोपी किरण भरम याने जोरात बोलला की, माझी केस संपवा. मला मोकळे करा. त्याच्या पायातील चप्पल काढून त्याने न्यायाधीशांच्या दिशेने भिरकावली.

The accused threw the slippers towards the judge saying, Judgesaheb, release me

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात